Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: अपूर्ण महामार्ग कामांमुळे अपघातांचा धोका; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

राजुरा ते तेलंगणा सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353B वरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाढते अपघात, खराब रस्ते आणि प्रवासी सुविधांचा अभाव लक्षात घेता संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2026 | 02:07 PM
Chandrapur News: अपूर्ण महामार्ग कामांमुळे अपघातांचा धोका; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

Chandrapur News: अपूर्ण महामार्ग कामांमुळे अपघातांचा धोका; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • अपूर्ण महामार्गाच्या कामांमुळे राजुरा-तेलंगणा मार्गावर अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप करण्यात आला.
  • खराब अंतर्गत रस्ते, पाण्याची टंचाई आणि प्रवासी निवाऱ्यांच्या अभावामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
  • अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली.
कोरपना: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ते तेलंगणा सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३बी वरील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी केला. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली.

Mira Bhayandar: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले; १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट, सक्तीच्या भूसंपादनाची मागणी

राजुरा ते तेलंगणा सीमेवरील परसोडा गावापर्यंत महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. मात्र या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरूम व दगडाची वाहतूक करण्यात आल्याने परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धानोली-कुसळ माथा फाटा,बोरगाव, हातलोणी, रूपापेठ, पारडी, टांगारा, मांडवा, चनई आदी गावांतील रस्ते खड्डेमय झाले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

देवघाट टोलनाका तसेच गडचांदूर उड्डाण पुलाचे काम पूर्ण झालेले नसतानाही सप्टेंबर २०२५ पासून टोलवसुली सुरू करण्यात आल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, प्रवासी निवारे उभारणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी आबिद अली यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे केली.

बोअरवेल हटविल्याने पाण्याची टंचाई

महामार्गाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणच्या बोअरवेल हटविण्यात आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महामार्गाच्या दुभाजकांमध्ये वाढलेल्या गवत व झाडांमुळे जनावरांचा वावर वाढून वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? आगामी दिवसांत होणार मोठा बदल, पाहा IMD चा नवा अंदाज!

नवीन प्रवासी निवाऱ्यांचा अभाव; नागरिकांची प्रचंड गैरसोय

राष्ट्रीय महामार्ग-३५३ बीच्या कामादरम्यान अनेक जुन्या प्रवासी निवाऱ्यांचे विस्थापन करण्यात आले. मात्र आर्वी, हरदोना, थुटरा, धामणगाव, बेलगाव फाटा, वडगाव, रामपूर फाटा, देवघाट, लोणी माथा फाटा, कन्हाळगाव, अकोला, चोपन, रूपापेठ, कोठोडा, गोविंदपूर आणि दुर्गाडी येथे अद्याप नवीन प्रवासी निवारे उभारण्यात आलेले नाहीत. परिणामी, प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असून महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने प्रवासी निवारे उभारून मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Nh 353b incomplete highway work road safety demand rajura telangana chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज
1

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज

Plastic Currency : भारतीयांच्या हातात कधी येणार प्लास्टिकच्या नोटा? RBI गव्हर्नरने दिली महत्त्वाची माहिती
2

Plastic Currency : भारतीयांच्या हातात कधी येणार प्लास्टिकच्या नोटा? RBI गव्हर्नरने दिली महत्त्वाची माहिती

Raigad News: महाडकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘अपेक्स टर्फ’चे उद्घाटन; फुटबॉल-क्रिकेटसाठी मिळणार दर्जेदार सुविधा
3

Raigad News: महाडकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘अपेक्स टर्फ’चे उद्घाटन; फुटबॉल-क्रिकेटसाठी मिळणार दर्जेदार सुविधा

PVR INOX Smart Cinema : पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय! चित्रपटसृष्टीची नवी सुरुवात, लहान शहरांसाठी लाँच केले ‘स्मार्ट सिनेमा’
4

PVR INOX Smart Cinema : पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय! चित्रपटसृष्टीची नवी सुरुवात, लहान शहरांसाठी लाँच केले ‘स्मार्ट सिनेमा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.