
Raigad News: महाडकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात 'अपेक्स टर्फ'चे उद्घाटन; फुटबॉल-क्रिकेटसाठी मिळणार दर्जेदार सुविधा
Chandrapur News: अपूर्ण महामार्ग कामांमुळे अपघातांचा धोका; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
महाडमधील उद्योजक चेतन उतेकर तसेच त्यांचे सहकारी अजिंक्य सुतार, केदार कवे आणि विनायक इनामदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पामुळे महाडमध्ये प्रथमच अशा स्वरूपाची जाळीदार बंदिस्त कृत्रिम गवतावरील आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध झाली आहे. या मैदानावर फुटबॉल, टेनिस बॉल क्रिकेटसह विविध मैदानी खेळ वर्षभर सुरक्षित वातावरणात खेळता येणार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये अशा सुविधा सर्वसामान्य असल्या तरी महाडमध्ये त्यांचा अभाव जाणवत होता. पावसाळ्यात मैदानांची दुरावस्था, वाढते शहरीकरण आणि खेळण्यासाठी मोकळ्या जागांचा तुटवडा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नाममात्र शुल्कात खेळाडूंना ठराविक वेळेसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात येणार असून युवक, महिला आणि बालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
लाडवली येथील क्रीडा संकुल दुरवस्थेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, त्या संकुलासाठी पूर्वी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र त्याचा अपेक्षित दर्जाचा वापर झाला नाही, याची खंत आहे. सध्या एमआयडीसीच्या माध्यमातून काळीज, महाड परिसरात आणखी आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उद्घाटन सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानिमित महिलांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल आठ महिला संघांनी सहभाग घेतला, एकेकाळी बोटावर मोजण्याइतके महिला क्रिकेट संघ असलेल्या महाडमध्ये आज मोठ्या संख्येने महिला क्रिकेटमध्ये पुढे येत असल्याचे समाधानकारक चित्र या स्पर्धेत पाहायला मिळाले. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याला महिला खेळाडू आणि क्रीडारसिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी उद्योजक चेतन उतेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत. महाडकरांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करीत अशा उपक्रमांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महाड शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून क्रीडा सुविधासाठी आरक्षित जागांचा पुढील काळात सकारात्मक विचार केला जाईल. पूर्वी अपेक्षित सुविधा निर्माण झाल्या नसल्या तरी आता त्यावर ठोसपणे काम करून महाडच्या खेळाडूंना अधिक सक्षम आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. – भरत गोगावले, मंत्री