Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबत महसूल मंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. यात जर मंत्री दोषी असेल तर ते राजीनामा देतील, असं यावेळी बावनकुळे म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 11, 2025 | 01:35 PM
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

पुणे : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलं जात आहे. या प्रकरणाची चर्चा ही राज्यभर होताना पाहायला मिळत आहे. अशातचं आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबत महसूल मंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. यात जर मंत्री दोषी असेल तर ते राजीनामा देतील, असं यावेळी बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले की, वस्तूस्थितीवर गेलं पाहिजे. आज धनंजय मुंडे यांचा नाव डायरेक्टली किंवा इनडायरेक्ट तपासामध्ये येत नाही. ज्या दिवशी ते तपासा देतील त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तपास हा मजबूत होत आहे यात आरोपी कोर्टातून सुटणार नाहीत, यासाठी सरकार काम करत आहे. योग्य तपास सुरू आहे. कोणत्याही प्रकरणात डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तूस्थितीवर बोललं पाहिजे. यात जर मंत्री दोषी असेल तर ते राजीनामा देतील अस यावेळी बावनकुळे म्हणाले. विभागीय आयुक्त पुणे कार्यालय येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

बीड प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळत आहे, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारल असता ते म्हणाले की, मी स्वतःहा सुरेश धस यांना भेटलो आहे आणि उद्याही भेटणार आहे. नेमकं या प्रकरणात राजकारण आमच्याकडून किंवा कोणाकडूनही झालं तर तपासाला वेगळं वळण मिळेल. सर्वांची जबाबदारी आहे की, या प्रकरणांमध्ये जागृत राहील पाहिजे. आरोपीला अंतिम शासन मिळाल पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी एकजूटपणे काम केले पाहिजे. या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. तसेच मला या प्रकरणात कोणावर आरोप करायचा नाही मात्र आरोपीला मदत नाही झाली पाहिजे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले नाही पाहिजे, असं यावेळी बावनकुळे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणारे अनेक लोक परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत बावनकुळे यांना विचारला असता ते म्हणाले की, कुठल्याही नेत्यांना प्रवेश घेताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पक्ष प्रवेश केला जाईल. महायुतीत कुठलाही तणाव निर्माण होणार नाही. महायुती महत्त्वाची आहे नेतृत्वाला विश्वासात घेऊन पक्षप्रवेश घेतला जाईल, असं यावेळी बावनकुळे म्हणाले.

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर नाराजगी व्यक्त केली आहे याबाबत बावनकुळे यांना विचारला असता ते म्हणाले की, पवार यांनी मान्य केलं बरं झालं काल पर्यंत हे लोक ईव्हीएम आणि मशीनवर दोष द्यायचे त्यांनी थोडा अभ्यास केला आहे. अजून थोडा अभ्यास करायचा गरज आहे. काय चुकलं याचं आकलन केलं तर गाडी परत येऊ शकते. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या चुका झाल्या होत्या. ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारलो आणि जनतेपर्यंत गेलो जनतेला सांगितलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतो. आणि जनतेने ते मान्य केलं. आज जनता आमच्यासोबत आहे. महाविकास आघाडी आपापसातल्या वादात पेटली आहे तर महायुती महारष्ट्राचं व्हिजन घेऊन पुढे जात आहे. असं यावेळी बावनकुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा : सोन्याची चकाकी ठरली खोटी; बनावट दागिने देऊन 10 लाखांची फसवणूक

चंद्रपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार एकत्रित असून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात विकास करायचा असेल तर पक्षाने विरोधी पक्ष एकत्रित करून विकासाकरता काम केले पाहिजे. महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील जनता महत्त्वाची आहे. हेवेदावे सोडावे लागतील आणि विकासाच्या व्यासपीठावर राजकारण करू नये. सुधीरभाऊ आमचे नेते आहेत. असं यावेळी बावनकुळे म्हणाले.

Web Title: Chandrasekhar bawankule has made a big statement regarding the resignation of dhananjay munde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • Beed Murder Case
  • BJP
  • Chandrasekhar Bawankule
  • dhananjay munde
  • Nationalist Congress Party
  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
1

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
2

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
3

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
4

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.