Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Jalgaon News: दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगितले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 05, 2026 | 01:15 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कर्जामुळे शेतकरी आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
  • दुष्काळासाठी जिल्हा नियोजन समितीचा सर्व निधी खर्च करण्याची माहिती देण्यात आली.
  • अवैध सावकारीविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या उपकरण चोरीवर मोक्का कारवाईचा इशारा.
 

कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती दुष्काळ निवारण उपसमिती अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रविवारी, आले होते. Jalgaon News:

चारा टंचाई, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्याबाबत उपाययोजना आगामी काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच जनावरांसाठीचा चारा शिल्लक असून, त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन व संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, अमोल जावळे, नंदकिशोर महाजन, किशोर पाटील व चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सीईओ करिश्मा नायर हजर होते.

जिल्हा नियोजनचा सर्व निधी दुष्काळासाठी

शेतकरी, महिला व बेरोजगारांना रोजगारासाठी योजना लवकरच अमलात येणार आहे. पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पीक पेरा, शेत रस्ता याबाबतच्या अडचणी सोडविल्या जातील. जिल्हा नियोजन समितीचा सर्व निधी दुष्काळावर खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक हजार ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

मोक्का लागणार

शेतकऱ्यांच्या वीज पंप आणि विद्युत , तारा, केबल, ट्रान्सफॉर्मर यांची चोरी 5 करणाऱ्या गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले. दुष्काळी परिस्थितीत कोणतेही आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार नाही, यासाठी प्रशासनाने पूर्णपणे खबरदारी त घेण्याचे आवाहन त्यानी केले.

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

अवैध सावकारांचे कंबरडे मोडणार

जिल्ह्यातील रावेर, यावल, रावेर तालुक्यातील अवैध सावकारीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा अवैध सावकारी करून कुणी नागरिकांची पिळवणूक करीत असेल तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील. अवैध सावकारी करणा-यांबाबत शासनाकडे तक्रार करा. त्यांचे कंबरडे मोडू, अशी ग्वाही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली. ते कुटुंबांना अडचणीत आणतात. त्यांना अडचणीत आणले पाहिजे, ४० निवेदने सावकारीबाबत प्राप्त झाल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Chandrashekhar bawankule farmer suicides banks responsible drought relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • farmer
  • Farmer Suicide
  • maharashtra

संबंधित बातम्या

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
1

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात
2

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
3

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
4

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.