Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Marathi Language: ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी तातडीने सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. मिळालेल्या स्थगितीचा गैरफायदा घेऊ नये आणि १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 05, 2026 | 01:15 PM
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

Follow Us
Follow Us:
  • अमराठी चालकांनो मराठी शिका!
  • ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’
  • अभियानाचा दुसरा टप्पा
 

मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा शिकणे ही केवळ अपेक्षा नसून सामाजिक जबाबदारी आहे. राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी भाषिक चालकांनी स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष करू नये. ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. (Marathi Language)

महाराष्ट्रात राहून, व्यवसाय करून येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करणाऱ्या प्रत्येक चालकाला प्रवाशांशी आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे.

Marathi Bhasha: मराठी पोटभाषा कोणत्या आणि किती आहेत, तुम्हाला …

अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० पेक्षा अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, राज्यात अद्याप सुमारे ८ ते ९ लाख अमराठी चालक रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहने चालवत आहेत.

त्यामुळे उर्वरित चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मर्यादित वेळेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमराठी चालकांना व्यवहारिक मराठी भाषा शिकवणे एक मोठ्या आव्हान आहे. त्यामुळे ज्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकलेली नाही त्यांनी तातडीने प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवावे अथवा ऑनलाईन पद्धतीने मराठी भाषा शिकावी असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही

दरम्यान, व्यवहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही, हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणतीही सबब किंवा मुदतवाढ मिळेलच, असे गृहीत धरू नये, असा स्पष्ट इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला.

“मराठी शिकण्यासाठी सरकारने प्रशिक्षणाची दारे खुली केली आहेत. स्थगिती ही मराठी शिकण्यापासून पळ काढण्याची संधी नाही, तर स्वतःला तयार करण्यासाठी मिळालेली मुदत आहे. या मुदतीत व्यावहारिक मराठी शिकून घ्या. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी करताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल,” असा सज्जड इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपण्याबरोबरच प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यामुळे “आज मराठी शिका, उद्याची कारवाई टाळा”, असा स्पष्ट संदेश देत अमराठी चालकांनी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

मराठी भाषेला ‘मराठी’ हे नाव कस पडलं? शब्दाच्या नावामागची रंजक कथा …

Web Title: Maharashtra marathi dialogue language campaign second phase non marathi drivers pratap sarnaik warning sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi Language
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत? सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतरच अंतिम मुहूर्त
1

बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत? सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतरच अंतिम मुहूर्त

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड
2

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी
3

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा
4

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.