Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’; वाचा कोणाकोणाचे अर्ज बाद?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ४५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यात अब्दुल सत्तारांचे सुपुत्र अब्दुल समीर, सुहास शिरसाट आणि संजना जाधव या दिग्गजांचा समावेश आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 10, 2026 | 04:04 PM
सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’; वाचा कोणाकोणाचे अर्ज बाद?
Follow Us
Follow Us:
  • सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर!
  • जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’
  • वाचा कोणाकोणाचे
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): सहकार बँकेच्या राजकारणातून राजकीय ‘वाट’ मोकळी करणाऱ्या जिल्ह्यातील याच बँकेच्या निवडणुकीत ‘नो इंट्री’ दाखवण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत कन्नडच्या आमदार संजना जाधव, विधान परिषदेचे भाजपाचे उमेदवार सुहास शिरसाट, आमदार अनुराधा चव्हाण, माजी खासदार दिवंगत साहेबराव पाटील यांच्या पत्नी इंदुमती पाटील, कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर, माजी आमदार अण्णासाहेब माने या दिग्गजांसह ४५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले.

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या ४ जुलै रोजी होत असून, या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीसा’ठी १५८ उमेदवारांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी सोमवारी झाली. आक्षेपांवर जिल्हा उपनिबंधक सम्रत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. छाननीत अर्ज अवैध ‘केलेल्या अर्जाचा निकाल मंगळवारी जाहीर केला. अर्ज बाद ठरलेल्या उमेदवारांची संख्या ४५ आहे. अब्दुल समीर यांचा अर्ज हा सोयगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखा ही त्यांच्या मालकीच्या जागेत भाडेतत्वार घेण्यात आली असल्यामुळे ते बँकेचे लाभार्थी म्हणून त्यांचा अर्ज बाद ठरला आहे.

२३ जूननंतर होणार निवडणुकीच चित्र स्पष्ट

सहकारी बँक आपल्याच ताब्यात राहावी, असे मनसुबे आखून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काही दिग्गज नेत्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज बाद होण्यास सभासदाचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण नसणे, अर्जात त्रुटी असणे आदी कारणे आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: ‘कचरा’ करणाऱ्यांची आता गय नाही! चार प्रकारांत वर्गीकरण अनिवार्य; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

कहीं खुशी, कहीं गम; दिग्गज नेत्यांचा झाला हिरमोड

अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मतदारसंघात २ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये रुपचंद गाडेकर, प्रदीप शिंदे यांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघात सुवर्णा जाधव, विशाल नादरकर, पुनम मगर, सुहास शिरसाट, दिपक जाधव, अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. शिरसाट हे विधान परिषद निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार आहेत. विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात मनोज राठोड, मंदाबाई राठोड, स्वरुपचंद कुकलारे, मधुकर हांडे या चार उमदेवारांचे अर्ज बाद केले आहेत.

यांचे अर्ज ठरले अवैध

फुलंब्री तालुक्यातून रामेश्वर चोपडे, आमदार अनुराधा चव्हाण यांचा अर्ज अवैद्य ठरला असला तरीही महिला प्रतिनिधी मतदारसंघातील त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. सोयगाव तालुक्यातील जयप्रकाश चव्हाण, कन्नडमधून आमदार रंजना चव्हाण, प्रिती पवार, मनोद देशमुख, गंगापूरमधुन इंदुमती साहेबराव पाटील, रुपचंद गाडेकर, वैजापूर तालुक्यातील मंदाबाई सोनवणे, पटेल परवीन नबी यांचा अर्ज बाद ‘रला आहे. बिगर शेती संस्था मतदारसंघातून अण्णासाहेब माने, अश्विनी मडके, प्रणिकेत पाटील, खान नुसरत अ. रहेमान कृषी पणन संस्था मतदारसंघातून आ. अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर अब्दुल सत्तार, रितेश मुनोत, काकासाहेब फरकाडे यांचे बाद ठरले आहेत.

निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील! त्यांना तात्काळ अटक करा; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

Web Title: 45 prominent leaders face direct no entry in district bank elections read whose nominations were rejected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.