Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी 'ऑपरेशन शोध-४' अंतर्गत धडाकेबाज कामगिरी करत १३ मुली आणि ४ मुलांसह एकूण १७ हरवलेल्या बालकांचा शोध लावला आहे आणि त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 25, 2026 | 03:34 PM
छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

Follow Us
Follow Us:
  • ‘माझं लेकरू परत आलं हो…’
  • छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
  • आई-वडिलांच्या भांडणांचा मानसिक ताण
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): घरातून निघून गेलेल्या लेकराच्या प्रतिक्षेत डोळ्यांत अश्रू आणि मनात भीती घेऊन दिवस काढणाऱ्या १७कुटुंबांच्या आयुष्यात ग्रामीण पोलिसांनी पुन्हा आनंद फुलवला आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन शोध-४ मोहिमेत ग्रामीण पोलिसांनी १३ मुली आणि ४ मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यामुळे हरवलेले हास्य, तुटलेला विश्वास आणि विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आली. ८ ते २३ जूनदरम्यान ग्रामीण पोलिसांनी हरविलेल्या व अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविली.

तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडिया तपास, सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे स्थानके, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणांवरील चौकशी तसेच विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधत प्रत्येक धाग्याचा पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांतून १७ बालकांचा शोध लागला. शोध लागलेल्या १७ बालकांपैकी ११ मुली प्रेमसंबंधांच्या प्रभावामुळे घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले. दोन मुलींनी रागाच्या भरात घर सोडले होते. मोठे शहर पाहण्याच्या आकर्षणातून तीन मुले घराबाहेर पडली होती, तर आई वडिलांमधील सततच्या वादाला कंटाळून एका मुलाने घर सोडल्याचे तपासात समोर आले, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, घरातून गेलेले मूल पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परत आणणे हा पोलिसांसाठी आनंद असतो.

इन्स्टाग्रामच्या आभासी जग

चिकलठाणा परिसरातील १७ वर्षीय मुलगी सोशल मीडियाच्या विशेषतः इंस्टाग्राम सक्रिय होती. आणि घरातील शिस्तीबाबत नाराज होऊन घरातून निघून गेली होती. तिच्या सोशल मीडिया खात्यांचा बारकाईने तपास करत पोलिसांनी संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली. त्यातून ती पुण्यातील एका मैत्रिणीकडे असल्याचे समोर आले. समुपदेशनानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

आई-वडिलांच्या भांडणांचा मानसिक ताण

करमाड परिसरातील १४ वर्षीय मुलगा घरातील सततच्या वादामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. घर सोडल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अखेर त्याला मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात शोधून काढले. मुलगा व पालकांचे समुपदेशन करून कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यात आले.

मुंबई पाहायची होती; तिघांचा प्रवास दादरपर्यंत

शिऊर परिसरातील १५ ते १६ वर्षे वयोगटातील तीन मित्रांनी मुंबई पाहण्याच्या उत्सुकतेतून घर सोडले. रेल्वे मार्ग, स्थानके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढत दादर रेल्वे स्थानक परिसरातून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

अभ्यासाच्या तणावातून मुलीने सोडले घर

शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय मुलगी अभ्यासाच्या कारणावरून आईसोबत झालेल्या वादानंतर घरातून निघून गेली होती. पोलिसांनी नातेवाईक व मित्रपरिवाराकडे चौकशी करत तिचा शोध घेतला. ती नातेवाईकांकडे सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर समुपदेशन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात

Web Title: A campaign by the chhatrapati sambhajinagar police reunited 17 scattered families

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • police

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
2

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.