Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“डीजेच्या आवाजाने महापुरुषांची प्रतिमा उंचावत नाही”; जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी डीजेबंदीचे केले समर्थन

संत एकनाथ नाट्यगृहात झालेल्या समन्वय बैठकीत त्यांनी डीजेबंदीचे जोरदार समर्थन करत उत्सव संयमाने आणि शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन केले. बैठकीत आंबेडकरी अनुयायांनी डीजेला परवानगी देण्याची मागणी लावून धरली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 12, 2026 | 05:48 PM
जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी डीजेबंदीचे केले समर्थन (Photo Credit- X)

जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी डीजेबंदीचे केले समर्थन (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “डीजेच्या आवाजाने महापुरुषांची प्रतिमा उंचावत नाही”
  • जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी डीजेबंदीचे केले समर्थन
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात डीजेबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, “डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे महापुरुषांची प्रतिमा उंचावत नाही; उलट त्रासच वाढतो,” असे ठाम मत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. संत एकनाथ नाट्यगृहात झालेल्या समन्वय बैठकीत त्यांनी डीजेबंदीचे जोरदार समर्थन करत उत्सव संयमाने आणि शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन केले. बैठकीत आंबेडकरी अनुयायांनी डीजेला परवानगी देण्याची मागणी लावून धरली. डीजे आधीच बुक केले आहेत, पारंपरिक वाद्ये उपलब्ध नाहीत, असा सुरु लावत बंदी शिथिल करण्याची मागणी केली होती.

डीजेमुक्तीचा आदर्श कायम ठेवा

गणेशोत्सव आणि शिवजयंतीदरम्यान शहराने डीजेमुक्तीचा आदर्श निर्माण केला असून, इतर जिल्हेही त्याचे अनुकरण करत आहेत, असे शिरसाट यांनी नमूद केले. हा आदर्श कायम राखण्याचे आवाहन त्यांनी आयोजकांना केले.

जयंतीसाठी सुरक्षा व नियोजन

सुरक्षा व्यवस्था : 1200 पोलिस कर्मचारी, 100 अधिकारी, एसआरपीएफची प्लाटून
मिरवणुका 4 मुख्य आणि 240 उपमिरवणुका
अभिवादन स्थळे : 96 पुतळे, 150 ठिकाणी प्रतिमा पूजन, 102 अभिवादन केंद्रे
सुविधा : 15 पाणपोई, 5 मोबाईल टॉयलेट

Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2026: डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीसाठी ठरतील मौल्यवान

धक्कादायक आकडेवारी

गेल्या वर्षीच्या जयंतीनंतर तब्बल 2,074 नागरिकांना बहिरेपणाचा फटका बसल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. एका घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की भांडणातील की, काही तासांनंतरच त्यांची श्रवणशक्ती पूर्ववत झाली. कायद्याचा आदर ठेवत डीजेबंदी पाळावी.

बॅनरबाजीवर कडक निर्बंध लावणार

अनधिकृत पोस्टर काढताना एका महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची आठवण करून देत महापौर समीर राजुरकर यांनी यंदा बॅनरबाजीवर कठोर कारवाईचे संकेत दिले. भडकल गेट परिसरात पाणी, मोबाईल टॉयलेट आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला उशीर; नागरिकांचा संताप

बैठकीचे वेळापत्रक दुपारी चारचे असतानाही पालकमंत्री दीड तास उशिरा पोहोचल्याने बैठक उशिरा सुरू झाली. साडे तीनपासून उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करत ही सर्वसामान्यांची बैठक असूनही आम्हालाच थांबावे लागते, अशी प्रतिक्रिया दिली.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध

Web Title: Against the backdrop of the jayanti celebrations guardian minister shirsat supported the ban on djs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayanti
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना वेग; उपकेंद्रांची दुरुस्ती सुरू
1

Chhatrapati Sambhajinagar: पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना वेग; उपकेंद्रांची दुरुस्ती सुरू

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल
2

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?

Chhatrapati Sambhajinagar Crime: पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या पत्नीची हत्या, पोलिसांनी केले अंत्यसंस्कार; कारण काय?
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या पत्नीची हत्या, पोलिसांनी केले अंत्यसंस्कार; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.