Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहानूरवाडी आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध; अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे ‘जनआंदोलन’

महापालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सोमवार, २७ एप्रिल रोजी शहानुरवाडी येथील सोमवार बाजारात जनआंदोलन करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 28, 2026 | 02:24 PM
अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे 'जनआंदोलन' (Photo Credit- X)

अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे 'जनआंदोलन' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शहानूरवाडी आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध
  • अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे ‘जनआंदोलन’
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शहानूरवाडी येथील आठवडी बाजार हा फार पूर्वीपासून चालत आलेला आठवडी बाजार आहे. पूर्वी हा भाग ग्रामीण भागात येत होता. आजही शहरातील असंख्य ग्रहक येथे बाजारासाठी येतात. त्यामुळे हा आठवडी बाजार बंद न करता येथे हॉकर झोन व्हावा, अशी अपेक्षा शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी केली.

महापालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सोमवार, २७ एप्रिल रोजी शहानुरवाडी येथील सोमवार बाजारात जनआंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ‘चला चला बाजाराला चला’ या घोषवाक्याखाली हे आंदोलन करण्यात आले. हातात विविध आशयाचे फलक, बॅनर घेत शिवसैनिकांनी महापालिकेच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. ‘गरीबांचा हक्क हिरावू देणार नाही’, ‘बाजार बंद करू देणार नाही’, ‘बिल्डरशाहीचा धिक्कार असो’, ‘गरिबांचा रोजगार वाचवा, आठवडी बाजार सुरू ठेवा’, ‘जनतेच्या रोजगारावर गदा आणू नका’, ‘मनपाचा धिक्कार असो’, ‘बिल्डरांच्या घशात भूखंड घालू नका’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

चला.. चला… बाजाराला चला…!!! आठवडी बाजार बंद करण्याच्या विरोधात शिवसेनेचे भव्य जनआंदोलन छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त… pic.twitter.com/zv9NytZwTD — Ambadas Danve (@iambadasdanve) April 27, 2026


संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही! पालकमंत्र्यांचा ‘स्पेशल फोर्स’चा मास्टरप्लॅन; बागेश्वर बाबांनाही दिला इशारा

यावेळी दानवे म्हणाले, आठवडी बाजार बंद करून संबंधित भूखंड खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे. हा निर्णय सर्वसामान्य नागरिक आणि लहान विक्रेत्यावर अन्याय करणारा आहे तसेच सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. भाजपच्या सत्तेखालील मनपा प्रशासनाने बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतला असून भाजपाच्या फायद्यासाठी याचा उपयोग केला जाणार असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. महापालिकेत भाजपची सत्ता असून सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक हा बाजार बंद करण्यासाठी हुकुमशाही पद्धतीने धोरण आखत आहे. मात्र, या निर्णयामुळे हजारो लहान विक्रेत्यांचा रोजगार आणि उदरनिर्वाह धोक्यात आला असून या जुलूमशाही विरोधात आगामी काळात निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दानवे यांनी दिला.

आम्ही जगायचे कसे सांगा ?

आंदोलनादरम्यान शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला विक्रेते व छोट्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला. अनेक विक्रेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. एका वयोवृद्ध भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिलेने मनपाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘आमचा उदरनिर्वाह या बाजारावर चालतो. बाजार बंद झाला तर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला. तर एका ज्येष्ठ विक्रेत्याने, ‘आता या वयात आम्ही दुसरा कोणता धंदा करणार’ असा सवाल केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा हाहाकार! पारा ४३.४ अंशांवर, मागील ३ वर्षांतील एप्रिलचा सर्व विक्रम मोडीत

Web Title: Ambadas danve protest against shahanurwadi weekly market closure sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

मोठी बातमी! 6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ? संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीला रवाना
1

मोठी बातमी! 6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ? संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीला रवाना

Pratap Sarnaik: …तर आमचे दरवाजे २४ तास उघडे’, ऑपरेशन टायगर’वरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं सर्वात मोठं विधान
2

Pratap Sarnaik: …तर आमचे दरवाजे २४ तास उघडे’, ऑपरेशन टायगर’वरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं सर्वात मोठं विधान

‘त्यांच्या’ साठी 24 तास दरवाजे खुले,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य
3

‘त्यांच्या’ साठी 24 तास दरवाजे खुले,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश
4

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.