औरंगाबाद : केंद्रशासन आणि भाजप सरकार ही कूटनीती खेळत असून, ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजप नेते करीत आहे. सत्तेचा वापर करून शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग केंद्र शासन आणि भाजप करत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. आज पहाटे सहा वाजता शिवसेना नेता व पालिकेतील स्थायी समिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकली याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नारायण राणे यांच्यावर भाजपाने या अगोदर आरोप केले होते, मात्र नारायण राणे भाजपात आल्यानंतर आता ईडीची चौकशी त्यांची करण्यात आली नाही. यासंदर्भात भाजपाकडे उत्तर आहे का, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या वरती आरोप करतात आणि ईडी लगेच चौकशी करून अटक करते. हा लोकशाहीचा खून नाही का, असा मोठा सवाल शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केंद्र शासनाला केला आहे. केंद्रात सत्ता असल्याने शासकीय यंत्रणाचा भाजपा सरकार गैरवापर करीत असल्याचा आरोप यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक सुरू; पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी, कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरु, सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात”]
राज्यात मागील दोन तीन वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणा चांगल्याच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळतायेत. दोन दिवसांपूर्वी ईडीने पहाटे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी धडक देत चौकशीसाठी मलिक यांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर मलिक य़ांना अटक करण्यात आली. ३ मार्चपर्यंत मलिक यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे, हे प्रकरण ताजे असताना आज पहाटे सहा वाजता शिवसेना नेता व पालिकेतील स्थायी समिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेनं धाडी टाकल्या आहेत. व तपास सुरु आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक सुरू; पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता https://www.navarashtra.com/latest-news/meeting-begins-in-delhi-under-the-chairmanship-of-prime-minister-narendra-modi-possibility-to-discuss-with-putin-nrdm-244804.html”]