रिक्षाचालक संकटात! गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला (photo Credit- X)
शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रशासनाकडून याचे खंडन केले जात असून, अशा अफवा न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. मात्र युद्धामुळे गॅस मिळणार नाही या भीतीने शहरवासियांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यातच गॅसवर चालणाऱ्या रिक्षाचालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅसची दरवाढ झाली आहे. युद्धाआधी ६२ रुपये किलो दराने मिळणार गॅस आजघडीला ८१ रुपये किलोने मिळत आहे. दरवाढीमुळे आणि मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ताळमेळ साधने अशक्य होत असल्याने रिक्षा चालक अडचणीत येत आहेत.
ऑटोरिक्षा चालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, युद्धामुळे रिक्षासाठी लागणाऱ्या गॅसची दरवाढ करण्यात आली आहे. युद्धाआधी ४६ रुपये दराने मिळणारा गॅस युद्ध सुरु होताच ६२ रुपयांवर गेला तर यात आणखी वाढ होऊन आज ८१ रुपये किलो दराने गॅस मिळत आहे. मीटरनुसार मिळणारे उत्पन्न आणि गॅससाठी लागणार खर्च यात ताळमेळ बसवण्यात रिक्षाचालकांची कसरत होत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट! उद्योजकांची तातडीची बैठक; राज्य सरकारकडे करणार मागणी
भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांच्यासह खासगी गॅस कंपन्यांकडे गॅस उपलब्ध आहे तरीही तुटवडा आणि दरवाढीचे कारण न समजण्यासारखे असल्याचे निसार अहमद म्हणाले. शहरात २५ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. यातील १ हजाराच्या आसपास पेट्रोलवर तर उर्वरित २४ हजारांहून अधिक रिक्षा या एलपीजी आणि सीएनजी गॅसवर चालतात.
दरवाढ आणि तुटवडा याबाबत आम्ही 6 आरटीओ याव्याशी बोललो असून आरटीओने आम्हाला प्रस्ताव देण्याचे सुचवले आहे. मात्र मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी आरटीओ आग्रह करत आहे. तरीही आम्ही आरटीओ यांच्याकडे प्रस्ताव देणार आहोत. आरटीओ हा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणकडे सादर करतील प्राधिकरण अध्यक्ष हे सकारात्मक निर्णय घेतील अशी आमची अपेक्षा आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असतात तर सचिव म्हणून आरटीओ हे असतात.
निसार अहेमद (अध्यक्ष, रिक्षा चालक महासंघ)
आज २६ रुपयांनी मीटरदर सुरु होते. त्यानंतर प्रत्येक किलोमीटर साठी १८ रुपये असा आहे. आमच्या मागणीनुसार सुरुवातीला २६ वरून २८ रुपये करा, प्रत्येक किलोमीटरसाठी १८ ऐवजी २० रुपये करावे अशी आमची मागणी असल्याचे निसार अहेमद यांनी सांगितले, मीटर कॅलिब्रेशन करण्याची अट ठेवू नये असेही त्यांनी सांगितले.
Chhatrapati Sambhajinagar: खुलताबाद पंचायत समितीत ‘अजब’ युती; भाजपचा सभापती तर ठाकरे गटाचा उपसभापती






