Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा रुग्णालयाला ‘फ्लेक्सबाजी’चा वेढा! रुग्णसेवेपेक्षा चमकोगिरीच जास्त; विद्रुपीकरणामुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त

छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात अनियंत्रित पोस्टरबाजीमुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. खासगी कंत्राटदारांच्या जाहिरातींमुळे रुग्णांची गैरसोय होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 13, 2026 | 04:00 PM
जिल्हा रुग्णालयाला ‘फ्लेक्सबाजी’चा वेढा! रुग्णसेवेपेक्षा चमकोगिरीच जास्त; विद्रुपीकरणामुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त
Follow Us
Follow Us:

 

  • जिल्हा रुग्णालयाला ‘फ्लेक्सबाजी’चा वेढा!
  • रुग्णसेवेपेक्षा चमकोगिरीच जास्त
  • विद्रुपीकरणामुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेचा आधार मानल्या जाणाऱ्या जिल्हा रुग्णालय परिसरात सध्या आरोग्यसेवेपेक्षा पोस्टरबाजीच अधिक ठळकपणे दिसून येत आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आतल्या विविध विभागांपर्यंत जागोजागी लावण्यात आलेल्या बॅनर, पोस्टर आणि माहिती फलकांच्या अतिरेकामुळे संपूर्ण परिसराचे अक्षरशः विद्रुपीकरण झाले असून प्रशासनाच्या चमकोगिरीचा हा प्रकार ठरत आहे.

शासकीय योजना सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना विविध वैद्यकीय सुविधा, उपचार पद्धती आणि शासनाच्या उपक्रमांची माहिती मिळावी, यासाठी माहितीपत्रके आणि फलक असणे आवश्यक आहे. मात्र माहिती देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनियंत्रित पोस्टरबाजीने रुग्णालयाचा मूळ उद्देशच हरवून बसल्याचे चित्र आहे. एका माहितीफलकावर दुसरा बॅनर, एका भिंतीवर तीन-तीन जाहिराती आणि मार्गदर्शक फलकांवरही प्रचाराचे साहित्य चिकटवण्यात आल्याने रुग्ण, नातेवाईक आणि प्रथमच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे, ज्या काही योजना पीपीपी किंवा पीपीई तत्त्वावर खासगी कंत्राटदारांकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत, त्या कंत्राटदारांनी रुग्णालय परिसराला जणू स्वतःची खासगी मालमत्ता समजून जागोजागी स्वतःच्या सेवांचे बॅनर लावले आहेत. काही ठिकाणी तर सरकारी माहितीपेक्षा खासगी संस्थांचे बॅनर अधिक ठळकपणे झळकत असल्याने हे जिल्हा रुग्णालय आहे की एखादे व्यावसायिक प्रदर्शन केंद्र, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि संबंधित प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन रुग्णालय परिसरातील अनधिकृत, अवाजवी आणि पुनरावृत्ती करणारे बॅनर हटवावेत, माहिती फलकांसाठी धोरण आखावे आणि सरकारी संस्थेची प्रतिष्ठा जपावी, अशी मागणी रुग्णांसह नागरिकांतून होत आहे. अन्यथा ‘रुग्णसेवेपेक्षा पोस्टरसेवा’ अशीच ओळख या रुग्णालयाची निर्माण होण्यास वेळ लागणार नसल्याचे बोलले जात आहे.

रुग्णालय प्रशासनाची डोळेझाक का ?

रुग्णालय परिसरात फलक लावण्यासाठी काही नियम नाहीत का ? असल्यास त्याची अंमलबजावणी का होत नाही? सार्वजनिक आरोग्य संस्थेचे सौंदर्य, शिस्त आणि माहिती व्यवस्थापन याकडे प्रशासनाने डोळेझाक का केली जातेय? कंत्राटदारांना एवढे मोकळे रान कोणी दिले? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

बॅनरबाजीला मोकळीक !

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे मानसिक संतुलन आणि स्वच्छ, सुटसुटीत वातावरण याला मोठे महत्त्व असते. मात्र येथे प्रवेश करताच भिंती, खांब, कॉरिडॉर आणि विभागांच्या प्रवेशद्वारांवर लटकणाऱ्या बॅनरच्या गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाच्या देखरेखीअभावी कोणालाही कुठेही बॅनर लावण्याची मोकळीक मिळाल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Web Title: Chhatrapati sambhajinagar district hospital poster banner issue patient inconvenience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.