Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: पार्किंगच्या समस्येवर ‘हायड्रोलिक’ तोडगा! पैठणगेटसह प्रमुख भागात अत्याधुनिक यंत्रणा; १५ कोटींची तरतूद

छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्किंगचा प्रश्न सुटणार! पैठणगेट, नागेश्वरवाडी येथे १५ कोटी खर्चून हायड्रोलिक पार्किंग उभारणार. तसेच आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी ४५ कोटींची निविदा मंजूर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 10, 2026 | 06:20 PM
पार्किंगच्या समस्येवर 'हायड्रोलिक' तोडगा!

पार्किंगच्या समस्येवर 'हायड्रोलिक' तोडगा!

Follow Us
Follow Us:

 

  • पार्किंगच्या समस्येवर ‘हायड्रोलिक’ तोडगा!
  • पैठणगेटसह प्रमुख भागात अत्याधुनिक यंत्रणा
  • १५ कोटींची तरतूद
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगचा प्रश्न तीव्र होत असताना महापालिकेने हायड्रोलिक पार्किंगचा पर्याय स्वीकारला आहे. पैठणगेट, नागेश्वरवाडी आणि मनपा मुख्यालय परिसरात अत्याधुनिक पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव पुढे सरकला असून असून यासाठी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये ई-टॉयलेट्स उभारण्यालाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शहरातील प्रमुख रस्ते आणि व्यापारी भागात अनियमित पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत
असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कमी जागेत अधिक वाहनांची सोय करण्यासाठी हायड्रोलिक प्रणाली प्रभावी उपाय मानण्यात आला आहे.
शहरात उपलब्ध जागा मर्यादित असताना वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पारंपरिक पार्किंगमध्ये मोठी जागा लागत असल्याने रस्त्यांवरच वाहने उभी राहतात.

हायड्रोलिक पार्किंगमध्ये उभ्या स्तरावर वाहनांची मांडणी केली जाते, त्यामुळे कमी जागेत दुप्पट-तिप्पट वाहनांची सोय शक्य होते. प्रारंभी पैठणगेट, नागेश्वरवाडी व मनपा मुख्यालय येथे ही सुविधा उभारली जाणार असून पुढील टप्प्यात पर्यटनस्थळांचाही विचार केला जाणार आहे.

मराठवाड्याचा डंका! गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’; ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे

वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न

अनधिकृत पार्किंगमुळे शहरातील वाहतुकीवर ताण येत आहे. विशेषत: व्यापारी भागात रस्ते अडवल्याने अडचणी वाढतात. हायड्रोलिक पार्किंगमुळे वाहनांची शिस्तबद्ध मांडणी होऊन रस्ते मोकळे राहतील. परिणामी वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील हालचाली अधिक सुरळीत होतील.

प्रकल्पाला गती…

शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू आहेत. दक्षिण पॅव्हेलियनसाठी ४५ कोटी रुपयांची निविदा अंतिम करण्यात आली आहे. स्टेडियमसाठी अतिरिक्त जागेबाबत प्रस्ताव तयार करून तो संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे.

सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक

Web Title: Chhatrapati sambhajinagar hydraulic parking project cricket stadium update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • No Parking

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क
3

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.