Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर मनपाचे ‘बजेट’ अंतिम टप्प्यात! ‘इतक्या’ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पाची शक्यता; नावीन्यपूर्ण योजनांवर भर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प ३२०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. नवीन नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 22, 2026 | 03:25 PM
छत्रपती संभाजीनगर मनपाचे 'बजेट' अंतिम टप्प्यात! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगर मनपाचे 'बजेट' अंतिम टप्प्यात! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर मनपाचे ‘बजेट’ अंतिम टप्प्यात!
  • ‘इतक्या’ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पाची शक्यता
  • नावीन्यपूर्ण योजनांवर भर
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Budget 2026: महापालिकेच्या निवडणुका पार पडताच २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा छत्रपती संभाजीनगरचा  अर्थसंकल्प सादर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा हा अर्थसंकल्प तब्बल ३२०० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, मागील वर्षाच्या तुलनेत तो अधिक विस्तारलेला असेल, असे संकेत मिळत आहेत. प्रशासनाकडून हा अर्थसंकल्प लवकरच स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे. लेखा विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्पाची अंतिम जुळवाजुळव सुरू आहे. विविध विभागांकडून प्रस्तावित विकासकामांची यादी मागविण्यात आली असून, त्यावर आधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यातील निवडक कल्पनांचाही यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश अपेक्षित आहे.

स्थायी समितीच्या दुरुस्तीनंतर वाढ शक्य

३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. समितीच्या चर्चेनंतर त्यात आवश्यक ते बदल करून तो सर्वसाधारण सभेसमोर मांडला जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान काही नव्या तरतुदींचा समावेश होऊन अर्थसंकल्पाचा आकार आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रभागनिहाय विकास प्रस्तावांची भर

यंदा प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून आल्यामुळे विकासकामांच्या प्रस्तावांचा ओघ वाढणार आहे. रस्ते, पाणी, मलनिस्सारण, उद्याने यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात मागण्या येण्याची शक्यता आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत कामांसाठीची तरतूद लक्षणीय वाढू शकते.

भोंदू बाबा प्रकरणावर संजय शिरसाट कडाडले! फोटोसाठी आता बुरखा घालून फिरावे लागेल का? तर अवकाळीग्रस्तांना मदतीचे आश्वासन

नावीन्यपूर्ण योजनांना पुन्हा चालना

गतवर्षी नावीन्यपूर्ण योजनांसाठी सुमारे १४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदाही अशाच प्रकारच्या उपक्रमांसाठी स्वतंत्र निधी राखीव ठेवण्याचे संकेत मिळत आहेत. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर काही नवीन प्रकल्पांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

‘विकासाला गती, पण आर्थिक ताणही वाढणार’

महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आकाराने मोठा असला तरी त्यामागे प्रलंबित कामांचा वाढता बोजा, कर्जाची परतफेड आणि नव्या विकास प्रकल्पांची गरज या तिन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे एकीकडे शहराच्या विकासाला गती मिळणार असली, तरी दुसरीकडे आर्थिक शिस्त राखण्याचे आव्हान आहे.

सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात

Web Title: Chhatrapati sambhajinagar manpa new development projects budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Budget
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.