Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील 29 कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 08:20 PM
ias tukaram Mundhe

ias tukaram Mundhe

Follow Us
Follow Us:
  • राज्यभरात एफडीएची भेसळखोरांवर कारवाई 
  • तुकाराम मुंढे आहेत एफडीएचे आयुक्त 
  • 29 कर्मचाऱ्यांनी केली होती मुंढेंविरुद्ध तक्रार 
Tukaram Mundhe Warn To 29 Officers: सध्या महाराष्ट्रात एफडीए करत असलेल्या कारवायांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. भेसळखोरांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात या कारवाया केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे शिस्तबद्ध आणि नियमानुसार काम करण्यासाठी ओळखले जातात. दरम्यान सध्या ते अन् व औषध विभगाचे आयुक्त आहेत. त्यांनी आपल्या एफडीएच्या कर्मचाऱ्यांना कठोर इशारा दिल्याचे समजते आहे.

महाराष्ट्रातील आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. पदभार स्वीकारल्यापासून अन्न भेसळ आणि नियमबाह्य कारभाराविरोधात धडक कारवायांचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढेंनी आता विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकरण काय? 

छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील 29 कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली होती. लॅबचे कामकाज अचानक दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आल्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले जात आहेत. अपुऱ्या मनुष्यबळात कामाचा अतिरिक्त ताण दिला जात असून, प्रलंबित नमुने वेगाने निकाली काढण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती.

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया काय?

छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील 29 कर्मचाऱ्यांनी मुंढे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. यावर आता मुंढे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळा ही कोणतीही साधी सरकारी कचेरी नसून, ती जनतेच्या आरोग्याशी थेट जोडलेली २४ तास कार्यरत राहणारी आणीबाणीची यंत्रणा आहे. 10 ते 6 असे ऑफिसचे टायमिंग लॅबमध्ये दिले जाऊ शकत नाही. लॅबची सेवा 24 तास चालणारी सेवा असते. म्हणजे यांच्या कर्मचाऱ्यांनी 24 तास काम केले पाहिजे असा यायचा अर्थ होत नाही.

Tukaram Munde News: तुकाराम मुंढे यांना पालक सचिवपदावरून तडकाफडकी का हटवले?

आपण शिफ्टमध्ये काम करतो. आठवड्याला 48 तासांपेक्षा कोणाला जास्त काम दिले जात नाही. तसेच एक दिवस सार्वजनिक सुट्टी देखील दिली जाते. आता आपण दोन शिफ्टमध्ये 6 दिवस काम सुरू केले आहे. आवश्यकता पडल्यास 24 तास सेवा सुरू करावी लागेल. त्यामुळे काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्यात येईल. आता त्या ठिकाणी व्यवस्थित काम सुरू आहे. ज्यांना शासन नियमानुसार काम करायचे नाही ते राजीनामा देऊन निघून जाऊ शकतात.

Web Title: Fda ias tukaram mundhe warning 29 employess to resign 24 hours lab work in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • FDA
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
1

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
2

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
3

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
4

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.