Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये! अनावश्यक कंत्राटी भरतीला चाप; आयुक्त अमोल येडगे यांचे कडक आदेश

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अनावश्यक कंत्राटी भरतीला चाप. आयुक्त अमोल येडगे यांनी मनुष्यबळाचा आढावा घेत दिले कडक आदेश.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 10, 2026 | 03:00 PM
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये! अनावश्यक कंत्राटी भरतीला चाप; आयुक्त अमोल येडगे यांचे कडक आदेश
Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये!
  • अनावश्यक कंत्राटी भरतीला चाप
  • आयुक्त अमोल येडगे यांचे कडक आदेश
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): महापालिकेत विनाकारण कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. अमोल येडगे यांनी विभागनिहाय मनुष्यबळाचा सखोल आढावा घेत, अत्यावश्यक असेल तेव्हाच कंत्राटी नियुक्ती करावी, असा स्पष्ट आदेश दिला आहे.

महापालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडील कामांचे पुनर्मूल्यमापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर आर्थिक जबाबदाऱ्या वगळता इतर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवून उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. झोन कार्यालय किंवा कोणत्याही विभागाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी आल्यास ती थेट मान्य न करता संबंधित विभागप्रमुखांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ तातडीची व अपरिहार्य गरज असल्यासच नवीन भरतीला हिरवा कंदील दिला जाणार आहे.

महापालिकेत बाह्यस्त्रोतांद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी चार एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. स्किल्ड, सेमी-स्किल्ड आणि अनस्किल्ड अशा तीन स्तरांवर कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात. विभागप्रमुखांच्या मागणीनुसारच ही प्रक्रिया राबवली जाते.

मराठवाड्याचा डंका! गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’; ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे

वेतन, बिल प्रक्रिया स्पष्ट

कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जाते. यावर ३.८५ टक्के सेवा शुल्क एजन्सींना दिले जाते. सुरुवातीच्या तीन महिन्यांचा पगार एजन्सीकडून करण्यात येतो. त्यानंतर सादर केलेल्या बिलावर २ टक्के आयकर कपात केली जाते. बिलासोबत हजेरीपत्रक जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रशासनाचा स्पष्ट संदेश

उपलब्ध मनुष्यबळाचा पूर्ण क्षमतेने वापर करा; अनावश्यक खर्च टाळा, असा स्पष्ट संदेश आयुक्तांनी दिला आहे. विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करत कंत्राटी भरतीवरील अवलंबित्व कमी करावे, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal corporation ban on unnecessary contractual recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Job

संबंधित बातम्या

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
1

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
2

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात
3

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न
4

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.