Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ई-पॉस प्रणालीला मुदतवाढ न मिळाल्यामुळे जून महिन्याचे ७० टक्के रेशन धान्य वितरण रखडले आहे. यामुळे जिल्ह्यातील २४ लाख १६ हजार लाभार्थी संकटात सापडले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 25, 2026 | 02:01 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले!

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले!
  • ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात
छत्रपती संभाजीनगर / सिल्लोड (शहर प्रतिनिधी): ई पॉस प्रणालील मुदतवाढ न मिळाल्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे जून महिन्याचे ७० टक्के धान्य वितरण रखडले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचा अनुदेय लाभ ई-पॉस मशिनव्दारे पात्र लाभाध्यांना वित्तरीत/वाटप करण्याकामी माहे जुन-२०२६ करिता ई-पॉस मशिनला पॉलिसीनुसार मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनास सादर करण्यात आलेला आहे. तथापि सदर जून- २०२६ करिता ई-पॉस प्रणालीला पॉलिसीनुसार मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्तावाबाबत अदयापही निर्णय प्राप्त झालेला नाही परिणामी जिल्ह्यातील धान्य वितरण थांबलेले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाचे एनइएसए योजनेचे माहे जून-२०२६ करीता ई पॉस अन्नधान्याचे केवळ ३०% वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील लाभार्थी वाटप कधी सुरु होणार अशी विचारणा करीत आहे. मात्र कुणाकडून आदेश प्राप्त न झाल्याने पुरवठा विभागाकडे त्याचे कुठलेही समाधानकारक उत्तर नाही. वाटप अदयाप पूर्ण झालेले नाही. ई पॉस प्रणालीला माहे जून-२६ या महिन्याकरीता मुदतवाढ मिळावी अशी मागणी करणारे पत्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून २२ जून २०२६ रोजी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पुन्हा पाठवण्यात आले आहे.

वितरण प्रणालीमध्ये बदल होणार?

देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली आणि शिधावाटप प्रणालीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६ चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधावाटपाच्या पद्धतीत बदल प्रस्तावित आहेत. सरकारच्या मते, या बदलाचा उद्देश अन्न आणि पोषण सुरक्षा मजबूत करणे आणि वितरण प्रणाली अधिक न्याय्य बनवणे हा आहे.

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न

जिल्ह्यात २४ लाख १६ हजार ७७८ लाभार्थी

येत्या २ दिवसांत आदेश प्राप्त झाला नाही तर माहे जून-२०२६ या महिन्याच्या अन्नधान्याच्या देय लाभापासून पात्र लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५ लाख ५२ हजार ७८१ शिधापत्रिकांद्वारे २४ लाख १६ हजार ७७८ लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळत आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजना अंतर्गत ६७ हजार ३४४ शिधापत्रिका व २ लाख ९० हजार ९८४ लाभार्थी, तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत ४ लाख ८५ हजार ४३७ शिधापत्रिका व २१ लाख २५ हजार ७९४ लाभार्थी समाविष्ट आहेत.

छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक लाभार्थी

जिल्ह्यातील सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर शहर विभागात असून येथे एएआय व पीएचएच मिळून ५ लाख ३७हजार ३२० लाभार्थी आहेत. तर
सिल्लोड (२ लाख ९४ हजार ५६८), छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (२ लाख ७५ हजार १५) आणि कन्नड (२ लाख ६९ हजार ४७६)

काय असतील फायदे?

या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे शिधावाटप प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि संतुलन वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या गरजेनुसार धान्य मिळेल याची खात्री होईल. मोठ्या आणि गरजू कुटुंबांना याचा विशेष फायदा होईल, कारण आता शिधावाटप कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार निश्चित केले जाईल. केंद्र सरकारने या मसुदा विधेयकावर सर्वसामान्य जनता, तज्ज्ञ आणि इतर हितधारकांकडून सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. इच्छुक व्यक्ती १३ जुलै २०२६ पर्यंत सरकारकडे आपली मते आणि सूचना सादर करू शकतात.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला

Web Title: Chhatrapati sambhajinagar ration distribution stopped due to epos machine policy delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • Sillod

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
4

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.