Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: त्रुटी दूर करा अन् वेळेत पाणी द्या! विभागीय आयुक्तांनी यंत्रणांना दिल्या आढावा बैठकीत सूचना

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहराला डिसेंबरपर्यंत ३९२ एमएलडी पाणी मिळणार आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला असून ६ हजार रुपयांत नवीन नळ जोडणी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 29, 2026 | 01:52 PM
Chhatrapati Sambhajinagar: त्रुटी दूर करा अन् वेळेत पाणी द्या!

Chhatrapati Sambhajinagar: त्रुटी दूर करा अन् वेळेत पाणी द्या!

Follow Us
Follow Us:
  • त्रुटी दूर करा अन् वेळेत पाणी द्या!
  • विभागीय आयुक्तांनी यंत्रणांना दिल्या आढावा बैठकीत सूचना
  • वाचा सविस्तर बातमी!
Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर शहराला (Chhatrapati Sambhajinagar) पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उर्वरित मुख्य कामे योग्यरित्या पूर्ण करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी आढावा घेतला. यावेळी शहरातील घरोघरी पाणी पोहचविण्यासाठी पाणी वितरण करण्याच्या अनुषंगाने महापालिकेला नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पाणीपुरवठा संदर्भात जलवाहिन्या जोडण्याची कामे, जॅकवेलची कामे, पंपिंग, पाणी शुद्धीकरण आणि बटरफ्लाय व्हॉल्वची दुरुस्ती व तपासणी, वितरणव्यवस्थेसह संपूर्ण कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत जलकुंभात पाणी पोहचविण्यासाठी जलवाहिनी लिकेज असल्यास तातडीने दुरुस्ती, उपाय योजना करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी यंत्रणांना केली.

कामाची माहिती

बैठकीला झेडपी सीईओ मिन्नू पी.एम., मनपा आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र प्राधिकरणाच्या जीवन मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कंत्राटदार कंपनीचे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित सर्व विभाग आणि कंत्राटदार कंपनीद्वारे सद्यस्थितील कामांची माहिती देण्यात आली.

Abdul Sattar: सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; ‘शासकीय योजनांमध्ये अडवणूक अन्…’

घंटागाडीद्वारे ऑडिओच्या माध्यमातून जनजागृती करावी

  • पालिका आयुक्त येगडे म्हणाले, घरोघरी पाणी पोहचविण्यासाठी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना नळ जोडणी देण्यात येणार आहे.
  • त्यासाठी फॉर्म भरून घेण्यात येणार असून अर्धा इंच नळ जोडणीसाठी किमान सहा हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • ही माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑडिओ क्लिपही तयार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
  • यावर, ठिकठिकाणी कॅम्प घेऊन, पॉम्पलेटच्या माध्यमातून तसेच कचरा घंटागाडीद्वारे ऑडिओच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या.

पाणी मिळणार कधी ?

शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी येण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी आतापर्यंत पाण्यासाठी डेडलाईन दिल्या आहेत. मात्र काही ना काही कारणांमुळे याला पुढची तारीख मिळत आहे. दरम्यान, योजनेच्या कामासाठी आता कुठलीही डेडलाईन दिली जाणार नाही त्यामुळे कंत्राटदाराने कुठलाही वेळकाढूपणा न करता डिसेंबरपर्यंत शहराला पूर्ण क्षमतेने म्हणजेच ३९२ एमएलडी पाणी द्यावे, वितरण जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ तयार करणे आदी कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मजीप्राचे सदस्य सचिव रंगा नायक यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिला होता. ही डेडलाईन न पाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. यामुळे पाणीपुरवठा योजनेला आणखी वेग आल्याचे चित्र आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मालमत्ताकर भरा, तरच नळ कनेक्शन! महापालिकेचा एसओपी तयार; टॅक्स फॉर्म वाटप सुरू

Web Title: Chhatrapati sambhajinagar rectify deficiencies and ensure timely water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water supply
  • Water Supply Issue

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.