
लाडकी बहीण योजनेवर मुख्यमत्र्यांचे मोठे विधान (Photo Credit - X)
लाडकी बहीण योजनेवर मुख्यमत्र्यांचे मोठे विधान
आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात लाडक्या चहिणींना लखपती बनविणार असून जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, आगामी काळात मोफत वीज देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. शिवाय खुलताबाद, सुलीभंजन, वेरूळ, म्हैसमाळ आदी पर्यटन आणि धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी निधी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. करिता भाजपाच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांना निवडून जनशात देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
देशाच्या प्रगतीचे सामर्थ्य – संतांच्या आशीर्वादात
मुख्यमंत्री. फडणवीस पुढे म्हणाले की, संत शांतीगिरी महाराजांच्या एका अनुग्रहाने लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. संतांच्या शिकवणीमुळे आपली संस्कृती, धर्म प्रचाराचे कार्य सुरु आहे. देशात शांती स्थापन करुन आपला देश प्रगतीपथावर नेण्याचे कार्य पूर्णत्वास नेण्याचे सामर्थ्य या संतांच्या आशीर्वादात आहे. धर्माधिष्ठित समाज निर्मितीसाठी व अशा समाजाद्वारे – राष्ट्र उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
उपस्थित संत महंतांवर केली पुष्पवृष्टी
संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा सुरु आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज भेट दिली. संत शांतीगिरी महाराज हे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७५१ कुड यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिव मूर्तिचे पूजन व उदघाट्न करण्यात आले, कार्यक्रमस्थती येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित संत महंत यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर संत नागेश्वरानंद आणि संत अवीमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले,
‘पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी द्या’
आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात खुलताबाद तालुका हा ऐतिहासिक आणि चार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा असून तालुक्यात वैरूळ, सुलीभंजन, मौसमाळ आदी धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे असून आगामी काळात वा भागाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी बंद यानी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भाषणात केली.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, भाजपाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर धनायत, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, नगराध्यक्षपदाचे सिल्लोडचे उमेदवार सुरेश बनकर, फुलंब्रीचे उमेदवार सुहास शिरसाठ, खुललाबाचे उमेदवार परसराम बारगळ, वैजापूरचे दिनेश परदेशी, कन्नडच्या उमेदवार स्वाती कोल्हे, यांच्यासह एल. जी. गायकवाड, प्रकाश चव्हाण, संतोष कोल्हे आदी उपस्थित होते.