Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; टँकर प्रस्तावाकडे प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष, ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा

गंगापूर तालुक्यातील बोलठाण गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, ग्रामस्थ अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करत आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 02:58 PM
Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; टँकर प्रस्तावाकडे प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष, ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
Follow Us
Follow Us:
  • पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
  • टँकर प्रस्तावाकडे प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष,
  • ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
संभाजीनगर :  गंगापूर तालुक्यातील बोलठाण गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, ग्रामस्थ अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करत आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने संतप्त ग्रामस्थ आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर उरलेला पाणीसाठा अत्यल्प आहे. परिणामी महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलांना मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना रानावनात फिरून पाण्याचा शोध घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. 30 मार्च रोजी ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडीच्या वतीने गट विकास अधिकाऱ्यांकडे टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

मात्र, इतका कालावधी उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. टंचाई विभागाकडे प्रस्ताव पाठवूनही फाईल धुळ खात पडली असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करत इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही, तर अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. बोलठाणमधील ही पाणीटंचाई आता केवळ समस्या नसून, प्रशासनाच्या उदासीनतेचा जिवंत पुरावा ठरत आहे.

प्रशासन झोपेत आहे का?
ग्रामपंचायत सदस्य करीमा हारुण पठाण यांनी प्रशासनाच्या निष्क्रयतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते, तरीही अधिकाऱ्यांना कोणतीही तत्परता दिसत नाही. नागरिकांचे हाल पाहूनही प्रशासन झोपेतच आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

एकीकडे पाण्यासाठी वणवण करावी लागतेय तर दुसरीकडे पैठणमध्ये पाणीटंचाईवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे पैठण तालुक्यातील पाणी परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल महिना अर्धा उलटूनही तालुक्यात पाणीटंचाई जाणवत नसून, मागील काही वर्षांच्या तुलनेत परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. विशेष म्हणजे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात घटली असून प्रशासनालाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. साधारणतः दरवर्षी मार्च अखेरपासूनच अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ येते. मात्र यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंतही अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. यावरून भूजल पातळी चांगली टिकून असल्याचे स्पष्ट होत आहे. विहिरी, बोअरवेल व पाणवठ्यांमध्ये अद्यापही पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

१४ एप्रिलपूर्वी शिक्षकांचे वेतन द्या! जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक समितीने निवेदन

तालुक्यातील ग्रामीण भागातून पाणीटंचाईबाबत पंचायत समितीकडे आतापर्यंत केवळ तीनच प्रस्ताव दाखल झाले आहेत. यात रांजणगाव खुरी, अब्दुल्लापूर तांडा आणि आडूळ (खुर्द) या गावांचा समावेश आहे. हे प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक राजेश कांबळे यांनी दिली.

मागील वर्षी याच काळात अनेक गावांकडून प्रस्तावांची संख्या मोठी होती, त्याच्या तुलनेत यंदाची संख्या अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, केंद्र व
राज्य सरकारच्या विविध पाणीपुरवठा योजनांचाही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या वॉटर ग्रीड योजना तसेच ‘हर घर नल जल’ योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचल्याने अनेक गावांमध्ये घराघरात नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पारंपरिक जलस्रोतांवरील ताण कमी झाला असून टँकरची गरजही घटली आहे. याशिवाय, जलसंवर्धनाच्या कामांनाही यंदा चांगले फळ मिळाले आहे.

आवश्यकतेनुसार उपाययोजना
पुढील मे-जून महिन्यात तापमान वाढल्यास काही भागात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यकतेनुसार तातडीने उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.पैठण तालुक्याची टँकरमुक्तीकडे वाटचाल एकूणच, चांगला पाऊस, प्रभावी योजना आणि जलसंवर्धन यांचा संगम झाल्याने यंदा पैठण तालुक्यात पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास यावर्षी तालुका मोठ्या प्रमाणात ‘टँकरमुक्त’ राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांना स्मार्ट ‘पोलिसिंग’चे धडे! सायबर धोक्यांविरुद्ध सजगतेची माहिती, सीसीसीचे दिले प्रात्यक्षिक

Web Title: Demand for drinking water in gangapur administration is ignoring tanker proposal villagers warn of agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sambhajinagar New
  • Water supply

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.