Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले; पाहा काय आहे नेमके कारण?

कुचकामी झालेली जलवाहिनी अन् वारंवार होणारा तांत्रिक बिघाड धरणात मुबलक पाणी असूनही उपसा करता येत नाही. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना टँकरने पाणीपुरवठा करणे देखील महापालिकेला शक्य होत नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 03:39 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले (photo Credit- AI)

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले (photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी!
  • जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले
  • पाहा काय आहे नेमके कारण?
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: धरण उशाला अन् कोरड घशाला… ही म्हण संभाजीनगकरांसाठी पूर्णपणे लागू होते. मराठवाड्याची तहान भागवणारे ‘जायकवाडी धरण पैठण शहरात भरलेले असतानाही पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ शहरवासीयांवर येत आहे. कुचकामी झालेली जलवाहिनी अन् वारंवार होणारा तांत्रिक बिघाड धरणात मुबलक पाणी असूनही उपसा करता येत नाही. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना टँकरने पाणीपुरवठा करणे देखील महापालिकेला शक्य होत नाही. परिणामी पाण्याच्या टाक्यावर टँकरच्या रांगा लागल्या आहेत.

गुढीपाडव्याला जॅकवेल द्वारे पाणी उपसा करण्याची घोषणा महापालिकेने केली असलीतरी शहरवासीयांना हे ‘दिव्य स्वप्न’ वाटत आहे. शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी देण्यासाठी नव्या जलवाहिनीचे नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असून पंपहाऊसमध्ये बसवलेल्या जॅकवेल मधून पाणी उपसा करुन दररोज पाणी देण्याची

व्यवस्था केल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी मागील दोन दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. यावर उपाय म्हणून टैंकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची सोय केली गेली. माञ, इथेही प्रशासनाच्या चुकांमुळे पाण्याचे टँकर भरण कठीण जात असल्याने पाण्याच्या टाक्यांवर टँकरच्या रांगा लागल्या आहेत.

उन्हाचा कडाका वाढला! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

संभाजीनगरात दररोज ८३ टँकरद्वारे ४८० फेऱ्यांव्दारे ८५ व सहा त्यांना पाणीपुरवठा केला जातो. नवीन वसाहतींमध्ये महानगरपालिकेने मागील २५ वर्षांपासून मात्र पाईपलाईन टाकलेल्या नाहीत. त्यामुळे अशा वसाहतींना टँकरद्वारे वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढते आहे. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने टँकरची मागणी सुद्धा वाढलो आहे.

संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यामध्ये सातत्याने काही ना काही अडचणी येत आहेत. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी पाईपलाईन फुटणे अशा अनेक कारणांमुळे संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यामध्ये सातत्याने काही ना काही विघ्न येत आहेत. मंगळवारी दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेलवर धाडी टाकत ३८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त; जिल्ह्यात पुरवठा विभागाची मोठी कारवाई

Web Title: Despite jayakwadi being full the city remains thirsty see what exactly is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.