Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

जायकवाडी पंपगृहात केबल जळाल्याने आणि ढोरकीनला मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा २ दिवस लांबणीवर पडला आहे. सिडको-हडकोसह अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 03:32 PM
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis (Photo Credit- X)

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरवर पाणीसंकट!
  • पाईपलाईन आणि केबल बिघाडामुळे पाणीपुरवठा २ दिवस लांबणीवर
  • सिडको-हडकोसह अनेक भागात निर्जळी
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरवर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या मागे लागलेले संकट संपायचे नाव घेत नसून, अवघ्या काही तासांच्या अंतरात घडलेल्या दोन मोठ्या बिघाडांमुळे संपूर्ण शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. मध्यरात्री जायकवाडी येथील १०० दलली क्षमतेच्या योजनेवरील नवीन पंपगृहात केबल बस्ट झाल्यानंतर गुरुवारी दुपारी ढोरकीनजवळ याच योजनेची मुख्य पाइपलाइन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. परिणामी अनेक भागांतील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक ते दोन दिवसांनी पुढे ढकलण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

५ फेब्रुवारी रोजी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास जायकवाडी येथील नवीन पंपगृहात पंप क्रमांक एकच्या मोटार केबल कनेक्शनमधून धूर निघाल्याने ट्रिपिंग होऊन संपूर्ण पंपिंग बंद पडली. मनपा कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत केबल जळाल्याचे स्पष्ट झाले. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत बसविण्यात आलेल्या नव्या पंपाचा कॅपॅसिटर जळाला असून १६०० केव्हीए क्षमतेचजा ट्रान्सफॉर्मरही नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले. विद्युत दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पहाटे ४.३० वाजता तीन पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर दुपारी १.४० वाजता ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी पुन्हा पंपिंग थांबविली आणि दुपारी २.४० वाजता पाणी उपसा सुरू करण्यात आला. पंपिंग सुरू होत असतानाच ढोरकीनजवळ १०० दलली क्षमतेच्या योजनेवरील १२०० मिमी व्यासाची मुख्य पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळाली. यामुळे तातडीने पंपिंग बंद करण्यात आली.

कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची; संभाजीनगरमध्ये ‘ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर’ कार्यशाळा संपन्न

जीर्ण, जुनी यंत्रणा ठरत आहे डोकेदुखी

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ५६ व १०० दलली क्षमतेच्या दोन्ही योजना मोठ्या प्रमाणावर जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे कधी पाईपलाईन फुटणे, तर कधी विद्युत पुरवठ्यातील बिघाडामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. या सततच्या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकाच्या संयमाची परीक्षा होत आहे. दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले असले तरी या पाईपलाईनवर ९०० मिमीची पाईपलाईन टाकून त्यावर सिमेंट काँक्रिट करण्यात आल्यामुळे खोदकामासाठी जेसीबीचा वापर करावा लागत आहे.

सिडको-हडकोसह अनेक भागात निर्जळी

१२०० मिमीची मुख्य पाईपलाईन बंद असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सिडको, हडकोसह अनेक नव्या वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. ७०० व १०० मिमीच्या पाइपलाइनद्वारे मर्यादित प्रमाणात जुन्या शहरातील काही भागांनाच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे इतर भागांतील पाणीपुरवठ्याचे टप्पे काही ठिकाणी एक दिवसाने तर काही भागांत दोन दिवसांनी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपअभियंता किरण धांडे यांनी दिली.

‘सिद्धार्थ ‘समोरील जलवाहिनीचा पाईप बदलला

दरम्यान, रेल्वेस्टेशन ते ज्युबिली पार्क येथील जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या ७५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा काही भाग सिद्धार्थ उद्यानासमोरील नाल्यात गजल्याने खराब झाला होता. या ठिकाणी पाइपलाइन फुटून गळती होण्याची तसेच सांडपाणी जलवाहिनीतील पाण्यात मिसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, यामुळे खबरदारी म्हणून खराब झालेला जुना पाइप काढून सुमारे चार मीटर लांबीचा नवीन पाइप बसविण्यात आला असून त्याठिकाणी एक नवीन व्हॉल्व्हही जोडण्यात आला आहे. बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्तीच्या काळात ज्युबिली पार्क येथील जलकुंभाचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाने दिली.

Talath News: तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

Web Title: Dhorkin main pipeline burst jayakwadi cable burnt water supply delayed marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayakwadi Dam
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
1

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
2

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.