कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची; संभाजीनगरमध्ये 'ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर' कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेचे उद्घाटन घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, शस्त्रक्रियागार विभागप्रमुख डॉ. अनघा वरुडकर, रुग्णालयाच्या अधिसेविका मंदाकिनी ठोकळ, महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेच्या सदस्य अनसूया सावरगावे यांची उपस्थिती होती.
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे
कार्यक्रमाची सुरुवात परिचर्या व्यवसायाच्या आद्य प्रेरणास्थान असलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिवाजी सुळे यांनी कर्करोग रुग्णांच्या उपचारात परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. तसेच रुग्णसेवेत सहानुभूती, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अरविंद गायकवाड यांनी ऑन्कोलॉजी नर्सिंगमधील बदलते उपचारप्रवाह आणि परिचारिकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला.
कार्यशाळेत सुप्रिया भगत, ऋषिकेश देवडे, अश्विनी जाधव, जयश्री पाटील, आम्रपाली शिंदे या तज्ज्ञांनी कर्करोग प्रतिबंध, उपचार प्रक्रिया, रुग्ण व्यवस्थापन आणि उपशामक उपचार यांवर व्याख्याने दिली. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने सचिन देवकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला विधाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघटनेच्या कोषाध्यक्षा शुभांगी कडू यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य






