Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद

छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल टंचाईमुळे महापालिकेचे पाण्याचे टँकर बंद पडले असून ६० वसाहतींचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कृत्रिम टंचाई करणाऱ्या पंपचालकांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 24, 2026 | 03:35 PM
उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी (Photo Credit- X)

उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका !
  • पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी
  • डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद
छत्रपती संभाजीनगर: देशभर सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा (Diesel Shortage) मोठा फटका आता छत्रपती संभाजीनगर शहराला बसण्यास सुरुवात झाली आहे. डिझेल अभावी महापालिकेचे पाण्याचे टँकर जागेवरच उभे राहिल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. दुसरीकडे, ऐन हंगामात डिझेलसाठी शेतकऱ्यांची आणि उद्योजकांची होणारी धावपळ पाहता, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांची रविवारपासून झाडाझडती घेण्याचा कडक इशारा दिला आहे.

पाणी असूनही नागरिकांना मिळेना; ६० वसाहती तहानलेल्या!

शहरातील ‘नो नेटवर्क’ म्हणजेच ज्या भागात पाईपलाईन नाही, अशा भागांतील पाणीपुरवठ्याला डिझेल टंचाईचा मोठा फटका बसला आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे एकूण ९२ टँकर आहेत, त्यापैकी अनेक टँकर शुक्रवारी डिझेलअभावी बंद होते. सिडको एन-५ (Cidco N-5) आणि नक्षत्रवाडी या मुख्य जलकुंभांवरून शहरातील तब्बल ६० वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या जलकुंभांवर केवळ ५३ टँकर उपलब्ध राहिल्याने, जलकुंभात पुरेसे पाणी असूनही ते नागरिकांपर्यंत पोहोचवता आलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पालकमंत्र्यांकडून पंपचालकांची खरडपट्टी; रविवारपासून झाडाझडती

शेतकरी आणि नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना अचानक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. मध्यरात्रीपासून शेतकरी डिझेलसाठी पंपांवर रांगा लावून उभे असल्याचे पाहून पालकमंत्र्यांचा पारा चढला. त्यांनी उपस्थित पंपचालकांना कडक शब्दांत सुनावले आणि त्यांचे ‘स्टॉक रजिस्टर’ तपासण्याचे आदेश दिले. “अनेक पंपांवर पेट्रोल-डिझेलचा साठा उपलब्ध असूनही, त्याचे वितरण न करता कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अशा साठेबाजांची रविवारपासून प्रशासनामार्फत कडक झाडाझडती घेतली जाईल,” असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. तसेच उद्योगांसोबतच शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने डिझेल पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेना म्हणजेच शिंदे गटच ! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला

उद्योगांचे कंबरडे मोडले; जहाजांची भाडेवाढ आणि कामगारांचा तुटवडा

डिझेल टंचाईची झळ वाळूज आणि चिखलठाणा औद्योगिक वसाहतीतील (MIDC) उद्योगांनाही बसत आहे. कारखान्यातील यंत्रे चालवण्यासाठी आणि तयार माल बाजारपेठेत किंवा बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने उत्पादन थंडावले आहे.

“डिझेल टंचाईमुळे उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच मुंबईहून परदेशात निर्यात करणाऱ्या जहाज कंपन्यांनी (Shipping Lines) भाडेवाढ केल्याने उद्योजकांवर आर्थिक बोजा वाढला आहे. इन्शुरन्सचे दरही वाढले आहेत. शासनाने यावर तातडीने तोडगा काढून उद्योजकांना दिलासा द्यावा.” — अर्जुन गायकवाड, उद्योजक तथा माजी अध्यक्ष, मसिआ (MASSIA)

या संकटात भर म्हणून, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या औद्योगिक गॅसच्या तुटवड्यामुळे कंपन्यांनी कामाच्या शिफ्ट कमी केल्या होत्या. त्यावेळी गावी गेलेले कामगार आता कामावर परतायला तयार नाहीत, त्यामुळे उद्योजकांसमोर ‘कामगारांचा तुटवडा’ ही नवीन डोकेदुखी ठरत आहे. उत्पादनात घट झाल्याने उद्योजक चिंतेत आहेत.

विशेष तरतूद करणे अशक्य: जिल्हा पुरवठा अधिकारी

उद्योगांसाठी डिझेलचा विशेष पुरवठा करण्याची मागणी होत असली, तरी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी तांत्रिक अडचण स्पष्ट केली. ते म्हणाले, “इंधन टंचाई सर्वत्र आहे. उद्योगांना विशेष तरतुदीनुसार वेगळा डिझेल पुरवठा करणे पंप चालकांच्या व्यवस्थेनुसार अशक्य आहे. मात्र, प्रशासन म्हणून आम्ही औद्योगिक वसाहतींमधील पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधन साठा उपलब्ध राहील, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.”

Fuel Shortage Rumors: उन्हाळ्यातील शेतीकामांना ‘ब्रेक’? डिझेलच्या पीक पिरीयडमध्येच संभाजीनगरमध्ये इंधन तुटवडा

Web Title: Diesel shortage hits water supply and industries in chhatrapati sambhajinagar sanjay shirsat warns pump owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामांसाठी यंत्रणा युद्धपातळीवर
1

मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामांसाठी यंत्रणा युद्धपातळीवर

Petrol-Diesel : 6 रुपयांनी पेट्रोल झालं स्वस्त; डिझेलचेही दर उतरले, कोणत्या सरकारने दिला दिलासा जाणून घ्या
2

Petrol-Diesel : 6 रुपयांनी पेट्रोल झालं स्वस्त; डिझेलचेही दर उतरले, कोणत्या सरकारने दिला दिलासा जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; 10 दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढीचा बसला फटका, पेट्रोल आता…
3

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; 10 दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढीचा बसला फटका, पेट्रोल आता…

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या
4

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.