Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण! पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले; ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील

छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय युद्धामुळे डिझेल संकट अधिक गडद झाले आहे. पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर रविवारी पेट्रोल मिळाले, मात्र डिझेलअभावी शेतीची कामे ठप्प आहेत. आज नवीन साठा येण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 02:55 PM
संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण! पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले; ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील
Follow Us
Close
Follow Us:

  • संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण!
  • पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले
  • ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): मध्यपूर्व आशियातील (Middle East) युद्धाच्या भडक्यामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय इंधन टंचाईने आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडल्याने वाहनधारकांसह शेतकरी बांधव कमालीचे संतप्त झाले आहेत. मान्सून अगदी तोंडावर असल्याने शेतीची कामे करण्यासाठी डिझेलची प्रचंड गरज आहे; मात्र डिझेलअभावी ट्रॅक्टर जागेवरच थांबल्याने शेतकऱ्यांमध्ये उद्रेकाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी स्वतः मैदानात उतरत विविध पेट्रोल पंपांची अचानक पाहणी केली. करोडी येथील तुळजामाता पेट्रोल पंपावर संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना घेरून आपली कैफियत मांडली. यावर पालकमंत्र्यांनी पंपचालकांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे कडक आदेश दिले.

पालकमंत्र्यांची तंबी अन् रविवारी पंपांवर केवळ ‘पेट्रोल’चे दर्शन!

पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली आणि शनिवारपर्यंत बंद असलेले अनेक पंप रविवारी सुरू झाले. मात्र, पंपांवर पोहोचलेला साठा अत्यंत तोकडा होता. नागरिकांनी टंचाईच्या भीतीने वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्यामुळे आणि गरजेपेक्षा जास्त साठा करून ठेवल्यामुळे आलेला साठा काही तासांतच संपला. रविवारी शहरातील पंपांवर पेट्रोल उपलब्ध असले, तरी डिझेलसाठी मात्र पुन्हा ‘नो स्टॉक’ (No Stock) चे फलक झळकत होते. त्यामुळे रविवारी सलग चौथ्या दिवशी डिझेलसाठी शेतकऱ्यांची भटकंती आणि प्रतीक्षा कायम होती. वेळेत डिझेल मिळाले नाही, तर खरीप हंगामाची पूर्वमशागत खोळंबून शेतकऱ्यांचे वर्षभराचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

रविवारची जिल्ह्यातील इंधन स्थिती (आकडेवारी किलोलिटरमध्ये):

महानगरपालिका आणि जिल्हा पुरवठा विभागाने जाहीर केलेली रविवारची इंधन साठ्याची अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

इंधन प्रकार एकूण आलेला साठा (KL) एकूण झालेली विक्री (KL) शिल्लक साठा (KL)
पेट्रोल २,७४९ ७१५ २,०३४
डिझेल ३,१४६ १,३०४ १,८४२ (बहुतांश पंपांवर संपला)

टीप: डिझेलची मागणी प्रचंड असल्याने उपलब्ध झालेला साठा रविवारी दुपारपर्यंतच संपला.

मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामांसाठी यंत्रणा युद्धपातळीवर

पानेवाडी डेपोत टँकरच्या रांगा; आज परिस्थिती निवळण्याची शक्यता

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी परिस्थितीवर बोलताना सांगितले की, पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर सर्व तेल कंपन्यांना (IOCL, BPCL, HPCL) तातडीने पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“मनमाडजवळील पानेवाडी इंधन डेपोतून दररोज ४०० ते ५०० टँकर बाहेर पडतात. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे टँकरही सध्या रांगेत उभे आहेत. जसा टँकर्सचा नंबर लागेल, तसे ते शहराकडे मार्गस्थ होतील. आज सोमवार (२५ मे) रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होईल. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा अवाजवी साठा करू नये, केवळ गरजेपुरतेच इंधन भरावे. आज संध्याकाळपर्यंत परिस्थिती बऱ्याच अंशी निवळेल.” — प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

देशात सध्या इंधनाची सर्वाधिक टंचाई छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज सोमवारी येणारा नवीन साठा या संकटातून सुटका करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद

Web Title: Diesel shortage worsens in farmers face crisis before monsoon supply officer statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Petrol and diesel
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामांसाठी यंत्रणा युद्धपातळीवर
2

मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामांसाठी यंत्रणा युद्धपातळीवर

उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद
3

उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद

Petrol-Diesel : 6 रुपयांनी पेट्रोल झालं स्वस्त; डिझेलचेही दर उतरले, कोणत्या सरकारने दिला दिलासा जाणून घ्या
4

Petrol-Diesel : 6 रुपयांनी पेट्रोल झालं स्वस्त; डिझेलचेही दर उतरले, कोणत्या सरकारने दिला दिलासा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.