मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण
यंदा पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिकेने शहरातील सर्व १० झोनमध्ये स्वतंत्र आणि ‘मायक्रो प्लॅनिंग’ (सूक्ष्म नियोजन) केले आहे. गेल्या काही वर्षांतील अनुभवावरून शहरात ज्या ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा संवेदनशील व सखल परिसरांची आणि मुख्य मोठ्या नाल्यांची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनुसार प्राधान्यक्रमाने गाळ उपसण्याचे काम केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित झोनल अधिकाऱ्यांना कडक डेडलाईन देण्यात आली असून आयुक्त स्तरावर याचा नियमित आढावा घेतला जात आहे.
उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद
शहरातील मुख्य आणि अंतर्गत नाल्यांमधील वर्षानुवर्षे साठलेला गाळ, कचरा आणि पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पालिकेने स्वतःच्या यंत्रणेसोबतच खासगी कंत्राटदारांची मोठी यंत्रसामग्री मैदानात उतरवली आहे. सध्या शहरात खालील यंत्रणा २४ तास कार्यरत आहे:
पावसाच्या पाण्याचा निचरा अतिशय सुरळीत व्हावा यासाठी अंतर्गत भागातील छोटे नाले आणि पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गातील कचऱ्याचे ढीग उपसण्यावर विशेष भर दिला जात आहे.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, “मान्सूनदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना किंवा वाहनधारकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी आरोग्य आणि ड्रेनेज विभागाला आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ कागदावर काम न ठेवता, विविध झोनमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची मी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार आहे.” संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करून पाण्याचा प्रवाह मोकळा ठेवण्याला पालिकेचे पहिले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






