Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश

Farmers Are Distressed : नाचनवेल-पिशोर परिसरातील शेतकरी पाण्याअभावी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. कर्ज काढून, उधारीवर बियाणे, खते आणि औषधे घेऊन उभी केलेली पिके सुकत असल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे. त्यामुळे कर्जफेड, घरखर्च तसेच गुराढोरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 03, 2026 | 09:00 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • कर्ज फेडायचे कसे, घर चालवायचे कसे ? 
  • गुराढोरांसाठीही चारा-पाण्याची चिंता  
  • प्रशासनाने आता बांधावर पोहोचण्याची गरज  
Farmers Are Distressed : नाचनवेल परिसरातील शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका उभी ठाकली आहे. मोठ्या कष्टाने, घाम गाळून आणि कर्ज काढून उभी केलेली पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर सुकून वाळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिकांच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी यासाठी मोठा खर्च केला. काहींनी व्यापाऱ्यांकडून उधारी घेतली, तर काहींनी कर्ज काढून शेती उभी केली. पीक चांगले येईल आणि उत्पादनातून सर्व देणी फेडता येतील, अशी आशा होती. मात्र पाण्याअभावी पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशांवर पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट करणारा प्रश्न म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेली घरगुती खर्चाची चिंता. एकीकडे शेतात उभा असलेला शेतीमाल वाळून जात आहे, त्यातून उत्पन्न मिळण्याची आशा कमी होत आहे; तर दुसरीकडे घरातील किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन गरजांच्या खर्चाचे गणित वाढतच आहे.

शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, पीक हातातून निसटत आहे आणि घर चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर मात्र वाढत आहेत. मग शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं?  हा प्रश्न आज नाचनवेल-पिशोर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मनात घुमत आहे. घरात चूल पेटवण्यासाठी पैसा हवा, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा, आजारपणासाठी पैसा हवा, गुराढोरांच्या चारा-पाण्यासाठी पैसा हवा आणि पुढील हंगामासाठी पुन्हा शेतीत पैसा गुंतवावा लागणार आहे. मात्र उत्पन्नाचा मुख्य आधार असलेली शेतीच अडचणीत आली आहे.

Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

कर्ज फेडायचे कसे, घर चालवायचे कसे ?

शेतीसाठी घेतलेले कर्ज, व्यापाऱ्यांची उधारी, बियाणे-खते-औषधांचे पैसे आणि घरातील रोजचा खर्च या सगळ्यांचा ताळमेळ घालताना शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. वर्षभर कष्ट करूनही शेवटी हातात काहीच उरले नाही, तर पुढचा संसाराचा गाडा ओढायचा कसा, असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. संबंधित विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे करावे.

गुराढोरांसाठीही चारा-पाण्याची चिंता

पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने गुराढोरांना पाणी कुठून द्यायचे आणि चारा कुठून आणायचा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. माणसांच्या संसारासोबत जनावरांची जबाबदारीही शेतकऱ्यांनाच पेलावी लागत आहे.

प्रशासनाने आता बांधावर पोहोचण्याची गरज

चाललेले पीक आहे, तर दुसऱ्या हातावर घरखर्चाचा भार आहे. शेतात उत्पन्न नाही, पण घरात खर्च थांबत नाही. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी.

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

Web Title: Farmers distressed nachanvel pishor water shortage crop loss crisis sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Farmer Crisis
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
1

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…
2

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!
3

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती,  ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज
4

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती, ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.