Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paithan News: पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह गारपिटीने फळबागा उद्ध्वस्त; बळीराजा हवालदिल

पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान. आंबे, कलिंगड आणि उन्हाळी पिके उद्ध्वस्त. तात्काळ पंचनामे करण्याची आप्पासाहेब निर्मळ यांची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 05:01 PM
पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार! (Photo Credit- AI)

पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार!
  • वादळी वाऱ्यासह गारपिटीने फळबागा उद्ध्वस्त
  • बळीराजा हवालदिल
पैठण तालुक्यात सोमवारी संध्याकाळी अचानक काळेकुट्ट ढग येऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले यासोबत पडलेल्या गारपिटाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहेत. कलिंगड, आंबे, केळी, पपई, मोसंबी, डाळिंब सह उन्हाळी कांदा, गहू, बाजरी, आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहेत. अवकाळी पावसाने सर्वञ दाणादाण उडाली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा देखील अवकाळी पावसात भिजला गेला. दरम्यान, कृषीसह महसूल विभागाने झाललेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी चौंढाला शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब पा. निर्मळ यांनी केली.

पैठण तालुक्यातील पैठण शहरासह, आपेगाव, नवगाव, पाचोडसह थेरगाव, दादेगाव हजारे, कुतुबखेडा, वडजी, नांदर, हर्षी, दावरवाडी, कडेठाण परिसरात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात काही ठिकाणी पावसासोबत गारपीट झाली त्यामुळे उन्हाळी फळासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. समोवारी संध्याकाळी आकाशात काळेकुट्ट ढग येऊन वादळी वाऱ्यास जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला.

गारा अन सोबत विजेचा कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज गुल झाली होती. झाडे, उन्मळून पडली. या पावसाच्या फटक्यामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसला. तालुक्यात ठिकठिकाणी लिंबाचे वडाचे झार्ड कोसळल्याचे घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही. शेतकऱ्यांच्या आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा अक्षरशः सडा पडला तसेच जनावरांचे गोठ्यांचे पजे उडाली. चाळीचे नेट जमीनदोस्त झाल्या तसेच विजेचे खांब वाकल्या.

Amravati News : शेतकरी पुन्हा विळख्यात! जिल्ह्यात सावकारीचे वाढतेय ‘महाजाल’, तब्बल कोटींचं कर्जवाटप

ठिकठिकाणी झाडांच्या फाद्या तुटून पडल्या. याच बरोबर रस्त्यांवरील खड्यात आणि सखल भागामध्ये पाणी साचले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पीके आडवी झाली. अनेक भागांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाची शेत पिकांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हाती आलेल्या पिकाचे व शेतमालाचे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. या धक्क्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच शेतकरी पुढे अवकाळी अस्मानी संकट उभे आले आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी या ऋतूमध्ये दिवसभरात उन्हाळा पहावयास मिळतो तर रात्रीच्या वेळी पावसाळा पहावयास मिळत आहे. अशा या वातावरणामध्ये या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

आंब्याच्या कैऱ्या पडल्या गळून

या नैसर्गिक संकटाचा फटका आंब्यासह उन्हाळी भुईमुग, कांदा, बाजरी जनावरांच्या चा-याला बसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहेत. गतवर्षीच्या अवकळी पावसाच्या संकटातून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकळी पावसाने तडाका दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी पार कोलमडून पडला आहे. सध्या आंब्यांला लागलेल्या कैऱ्या वादळी तडाक्याने गळून पडल्या आहे तर टरबूज खरबूज काकडी, खिरे, कांदा इतर उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मात्र मिळाला, परंतु मोठे नुकसान झाले.

पवन ऊर्जा प्रकल्पांचा ‘काळा’ कारभार! मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर ‘खंडणी’चे गुन्हे; कंपन्यांचा मनमानी कारभार उघड

Web Title: Havoc of unseasonal rains in paithan taluka hailstorm accompanied by gusty winds devastates fruit orchards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Crop damage
  • farmer
  • Paithan

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..
3

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
4

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.