Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart City SPV Maharashtra: स्मार्ट सिटी मिशन संपले तरी ‘SPV’ संस्था कायम राहणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, महापालिका आयुक्तांकडे

केंद्र सरकारचे स्मार्ट सिटी मिशन संपल्यानंतरही महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेत 'एसपीव्ही' (SPV) संस्था कायम ठेवल्या आहेत. ११ मे २०२६ च्या जीआरनुसार आता महापालिका आयुक्त याचे प्रमुख असतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 17, 2026 | 01:30 PM
Smart City SPV Maharashtra

Smart City SPV Maharashtra

Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट सिटी मिशन संपले तरी ‘SPV’ संस्था कायम राहणार
  • राज्य शासनाचा मोठा निर्णय
  • महापालिका आयुक्तांकडे
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): केंद्र शासनाचे (Central Goverment) स्मार्ट सिटी मिशन संपुष्टात आल्यानंतर विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) संस्थांचे भवितव्य अनिश्चित झाले होते. मात्र राज्य शासनाने स्मार्ट सिटीची एसपीव्ही कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या देखरेखीसह भविष्यातील विशेष योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या व्यवस्थेनुसार महापालिका आयुक्त हे एसपीव्हीचे प्रमुख असतील, तर संचालक मंडळात लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. केंद्र शासनाने ३१ मार्च २०२६ रोजी स्मार्ट सिटी मिशनची औपचारिक सांगता केली.

पूर्ण झालेली अन् सुरू असलेली कामे आता महानगरपालिकेकडे वर्ग

त्यानंतर मिशनअंतर्गत पूर्ण झालेली तसेच सुरू असलेली कामे संबंधित महापालिकांकडे वर्ग करण्यात आली. या प्रक्रियेसोबतच स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्ही संस्थाही बरखास्त करण्यात आल्या आणि त्यांची संचालक मंडळे विसर्जित करण्यात आली होती. मात्र एसपीव्ही स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तसेच मान्यतेसाठी शासनाच्या विविध यंत्रणांकडे लाखो रुपयांचे शुल्क भरावे लागते. त्यामुळे एसपीव्ही रद्द झाल्यास यासाठी केलेली आर्थिक व प्रशासकीय गुंतवणूक वाया जाईल, अशी भूमिका काही महापालिकांतील तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनासमोर मांडली होती.

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश

याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाकडून भविष्यात जाहीर होणाऱ्या विशेष प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्ही उपयुक्त ठरू शकते, असा मुद्दाही शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने एसपीव्ही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, यासंदर्भातील शासन निर्णय ११ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार एसपीव्हीचे नेतृत्व आता महापालिका आयुक्तांकडे असेल. यापूर्वी ही जबाबदारी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असायची.

एसपीव्ही कायम ठेवण्यामागील प्रमुख कारणे

स्मार्ट सिटी मिशन संपल्यानंतरही शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची देखरेख आणि व्यवस्थापन सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे. एसपीव्ही बरखास्त झाल्यास त्यासाठी केलेल्या तांत्रिक प्रक्रिया, नोंदणी आणि लाखो रुपयांचे शुल्क निष्प्रभ ठरण्याची शक्यता होती. तसेच भविष्यात केंद्र किंवा राज्य शासनाच्या विशेष नागरी विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उपलब्ध राहावी, यासाठी एसपीव्ही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष; पाच तालुक्यांत पाणीटंचाई, जिल्ह्याच्या सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ

Web Title: Maharashtra govt to retain smart city spv municipal commissioners appointed as heads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • central goverment
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Smart City

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.