Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahavitaran News: महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता घरात बसून होणार खंडित

छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने स्मार्ट मीटरद्वारे ऑटो डिस्कनेक्शन मोहीम सुरू केली आहे. थकीत बिल न भरल्यास आता रिमोटने वीज कापली जाणार. पाहा सविस्तर माहिती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 04:15 PM
महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! (Photo Credit- Ai)

महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:

 

  • महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका!
  • थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता घरात बसून होणार खंडित
  • संभाजीनगरमध्ये ७ हजारांवर कारवाई
ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकीदारांच्या विरोधात ‘ऑटो डिस्कनेक्शन’ मोहीम सुरू केली आहे. यामुळे थकीत वीजबिल भरायला विलंब करणान्या ग्राहकांचा पुरवठा ‘स्मार्ट मीटर’च्या माध्यमातून रिमोट पद्धतीने खंडित केला जात आहे. वीज बिलाची थकबाकी भरल्यानंतर वीजजोडणीचे काम आपोआप सुरू होणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात ७ हजार ७३६ हुन अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा स्मार्ट मीटरमधील स्वयंचलित प्रणालीद्वारे बंद करण्यात आला आहे.

महावितरणने राज्यभरात २० फेब्रुवारीपासून रिमोट डिस्कनेक्शन मोहीम राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी थकबाकीची रक्कम निश्चित कालावधीत भरली नाही तर, संगणक प्रणालीद्वारे वीज जोडणी बंद केली जात आहे. सुरुवातीला काही परिमंडलांत हा प्रयोग केल्यानंतर २३ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर परिमंडलातही स्मार्ट मीटर बसवलेल्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या काही दिवसांत ७ हजारांहून अधिक थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा स्मार्ट मीटरमधील स्वयंचलित प्रणालीद्वारे बंद करण्यात आला आहे. त्यापैकी दोन हजारांहून अधिक ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून वीजपुरवठा जोडून घेतला आहे. ऑटो डिस्कनेक्शननंतरही वीजबिल न भरणारा ग्राहक खरोखरच अंधारात आहे का की अनधिकृतरीत्या वीज घेऊन वापरतोय, याची पडताळणीही महावितरणकडून करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले; पाहा काय आहे नेमके कारण?

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सुमारे साडेदहा लाख अकृषी ग्राहकांपैकी जवळपास ४ लाख स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर बसविलेल्या घरगुती वीजग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर प्रतियुनिट ८० पैसे सवलत देण्यात येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. दरम्यान, स्मार्ट वीजमीटरबाबत जनमानसात सुरु असलेले गैरसमज दूर करण्यासाठी स्मार्ट महावितरणने मीटरसंदर्भात जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे. स्मार्ट मीटरने होणाऱ्या फायद्यांची माहिती देण्यात येत आहे. ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

असे काम करते ऑटो डिस्कनेक्शन प्रणाली?

स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये थकीत बिलाची नोद होताच संबंधित ग्राहकाला एसएमएसद्वारे सूचना दिली जाते. बिलाची अंतिम मुदत उलटल्यानंतरही रक्कम न भरल्यास प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित केला जातो. तशी यंत्रणा त्यात बसविण्यात आली आहे. यकबाकी भरल्यानंतर रिमोट पद्धतीने पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जातो. या प्रणालीमुळे मनुष्यबळाचा वेळ व श्रम वाचणार असून, थकबाकी नियंत्रणात येण्यास मदत होणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

उन्हाचा कडाका वाढला! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

Web Title: Mahavitarans smart move power supply to defaulters can now be disconnected remotely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mahavitaran

संबंधित बातम्या

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
1

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.