Baramati Power Outrage: शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणा, विद्युत पंप, घरगुती उपकरणे, दुकाने व विविध व्यवसायांवर वीजखंडित होण्याचा थेट परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असून, वीजपुरवठा सुरळीत…
शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी नांदेड येथे झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत सरकार व महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
कर्तव्य बजावत असताना एका महावितरणच्या कर्मचाऱ्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना परतूर शहरात घडली आहे. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Smart Meters: वीजचोरीसाठी स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीमध्ये समोर आले. या प्रकरणात २ लाख ६६ हजार ८०० रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.
स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी नऊ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येते. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होत असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षितता, वेळ आणि श्रम यांचीही बचत होते.…
Nashik Kumbh Mela: नाशिकच्या पंचवटी परिसरातील पेठ रोड रुंदीकरणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. महाकाय वीज पोलचे स्थलांतर आणि वीजवाहिन्यांच्या आधुनिकीकरणाच्या कामाला वेग आल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला चालना मिळणार…
वर्धा जिल्ह्यातील ५१ हजार वीज ग्राहकांकडे महावितरणची ₹१२.३२ कोटींची थकबाकी आहे. विशेष वसुली मोहिमेंतर्गत जुलै महिन्यात ६०० हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वेळेत बिल भरण्याचे आवाहन करण्यात…
पचखेडी परिसरातील अनेक शेतकरी मोटार पंपाच्या मदतीने शेताला पाणी देतात. मात्र, दिवसा वीज उपलब्ध असली तरी ती वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
साताऱ्यात राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
वैजापूर शहरातील इंदिरानगर येथील विवाहित महिला मजूर कविता लोधे यांचा शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे संतप्त नातेवाईकांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने ४८ तासांचा अल्टिमेटम देत २ दिवसांत १.४१ लाख स्मार्ट वीज मीटर बसवले आहेत. या सक्तीविरोधात कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात तसेच वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ शिरूर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
दक्षिण पुण्यातील कात्रज, सुखसागर नगर, आंबेगाव, दत्तनगर, संतोषनगर, अंजनीनगर तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक हैराण झाले आहेत.
पुण्यात वाढत्या उष्णतेसोबतच विजेच्या मागणीत झालेल्या वाढीचा परिणाम आता वीज यंत्रणेवर दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे परिमंडळात सात ठिकाणी केबल फॉल्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
Mahavitran Pre-Monsoon Work: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढवला आहे. ३० मे पर्यंत सर्व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत.
उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत.
राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देखभाल, दुरुस्तीची कामे आता दुपारी करण्याऐवजी सकाळी केली जाणार आहेत.