Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेना म्हणजेच शिंदे गटच ! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला

छत्रपती संभाजीनगरात आयोजित शिवसेनेच्या आढावा बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पक्षाच्या सुस्त कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 22, 2026 | 02:43 PM
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला (Photo Credit- X)

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • शिवसेना म्हणजेच शिंदे गटच !
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला
  • एसआयआर मोहीम
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संभाजीनगरची ओळख शिवसैनिकांच्या परिश्रमातून झालेली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या आदेशानुसार गट तटाचे राजकारण न करता नेत्यांनी मनभेद बाजूला सारुन पक्षवाढीच्या कामात योगदान देणे गरजेचे आहे. तिन्ही मतदारसंघात संघटनाबांधणीचे काम झालेले आहे ते समाधानकारक नसून हा आत्मचिंतनाचा विषय आहे. जिथे ताकद नाही तिथेही शिवसैनिकांनी मोठे काम केल्याचा अभिमान आहे. माञ व्यासपीठावरील नेत्यांनी कार्यकर्ता प्रमाणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत नेत्यांचे कान टोचण्याचे काम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संभाजीनगरातील मेळाव्यात केले.

संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार पुनरीक्षण मोहीम कामाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने संत एकनाथ रंगमंदिरात पदाधिकाऱ्यांचा माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. निवडणूक आयोगाने सुरू केलेली एसआयआर मोहीम, बीएलए नियुक्ती, संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आदींचा आढावा घेण्यासाठी मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार राहुल शेवाळे, संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, नगरसेवक त्र्यबंक तुपे, हर्षदा शिरसाट उपस्थित होते. सामंत म्हणाले, शिवसेनेचा मेळावा म्हटलं की घोषणाबाजी आणि उत्साहाने भरलेला असतो, मात्र आजचा मेळावा तणावपूर्ण वातावरणात पार पडतोय, याला शिवसैनिक आणि नेते जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले, तीन विधानसभा मतदारसंघात बीएलए नियुक्तीचे काम २५ ते ५० टक्केच झालेले आहे. तिन्ही मतदारसंघ मिळूनही शंभर टक्के काम होत नाही, असेही म्हणाले.

Fuel Shortage Rumors: उन्हाळ्यातील शेतीकामांना ‘ब्रेक’? डिझेलच्या पीक पिरीयडमध्येच संभाजीनगरमध्ये इंधन तुटवडा

आम्ही करून दाखवले

यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, विजय वाघचौरे, शुभम काळे यांनी मतदारसंघातील कामाची माहिती सादर केली. एकाही मतदारसंघात १०० टक्के काम झाले नसल्याचे ऐकून मंत्री सामंतांनी नाराजी व्यक्त केली. हे पक्षाचे काम आहे, सर्वांची सांधिक जबाबदारी आहे. मात्र आपण सर्व त्यास ‘हलक्यात’ घेत आहात. २ महिन्यात बीएल नेमणूकीचे काम २५ टक्के झाले आहे. साहेबांना काय सांगायचे., असेही ते म्हणाले, खासदार भुमरे यांनी १५ दिवसात १०० टक्के काम पूर्ण करण्याचा शब्द सर्वांच्या वतीने दिला.

शेवाळेंनी सांगितली भाजपची पद्धत

माजी खासदार शेवाळे यांनी सांगितले की, भाजपमध्ये मतदारसंघात राहणारे व्यक्ती, मोदी, अमित शहा, हेसुद्धा मतदार यादीचे प्रमुख आहेत. ही सिस्टीम भाजपची आहे. ते जरी पदावर असले तरी मतदार यादीची जबाबदारी त्या प्रमुख नेत्यावर टाकलेली आहे. एसआयआर मोहिमेच्या कामाची आढावा घेत असताना, पक्षातील पदाधिका-यांच्या कामाच्या फेरतपासणीचा आढावा घेण्यात येत आहे, जे काम करणार नाही, त्यांची नावेही पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळली जाईल, अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे.

एसआयआरचा मूळ उद्देश हाच; बीएलए नेमले नाही तर फायदा नाही

शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत यांनी मध्य विधानसभा मतदारसंघात ३२० बुथ असून, १६१ कव्हर केले, २३४ बीएलए नेमले, अशी माहिती सादर केली, तर मंत्री सामंत यांनी त्यांची आकडेवारी खोडून काढली, आपल्या मतदारसंघात बीएलए नियुक्ती २३४, एकूण बुथ कव्हर १६१ आहेत. कव्हर न केलेल्या बुथची संख्या १५९ आहे, तुमचा एकूण रिपोर्ट ५० टक्के असल्याचे सांगितले., त्यावर या मतदारसंघात १०० बुध हे पूर्ण मुस्लिम भागातील असल्याचे राजूपत म्हणाले. त्यावर एसआयआरचा मूळ उद्देश तोच आहे, मुस्लिम भागातच बांग्लादेशी, रोहिंग्यांची नावे असतात, आणि तीच आपल्याला रद्द करायची आहेत. ज्या भागातील संशयास्पद नावे वगळायची आहेत, तिथेच बीएलए नेमले नाही तर फायदा नाही, असे सांगत कानउघडणी केली.

“घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ !” छ. संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावरून अंबादास दानवे संतप्त

Web Title: Minister uday samant slams shivsena leaders in chhatrapati sambhajinagar review meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • shivsena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या
1

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या

पालिका रुग्णालयांच्या रक्तपेढ्या खासगीकरणाच्या मार्गावर? वाढत्या दरांच्या भीतीने विरोधक आक्रमक
2

पालिका रुग्णालयांच्या रक्तपेढ्या खासगीकरणाच्या मार्गावर? वाढत्या दरांच्या भीतीने विरोधक आक्रमक

Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये ‘शिवसंवाद’; ताफा बाजूला सारत ‘वंदे भारत’ने केला प्रवास
3

Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये ‘शिवसंवाद’; ताफा बाजूला सारत ‘वंदे भारत’ने केला प्रवास

Fuel Shortage Rumors: उन्हाळ्यातील शेतीकामांना ‘ब्रेक’? डिझेलच्या पीक पिरीयडमध्येच संभाजीनगरमध्ये इंधन तुटवडा
4

Fuel Shortage Rumors: उन्हाळ्यातील शेतीकामांना ‘ब्रेक’? डिझेलच्या पीक पिरीयडमध्येच संभाजीनगरमध्ये इंधन तुटवडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.