Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांची गय नाही, २ महिन्यांत थेट हकालपट्टी! छ. संभाजीनगर मनपा आयुक्तांचा कडक इशारा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. काम समाधानकारक नसल्यास थेट सेवेतून काढून टाकण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 11, 2026 | 02:15 PM
छ. संभाजीनगर मनपा आयुक्तांचा कडक इशारा

छ. संभाजीनगर मनपा आयुक्तांचा कडक इशारा

Follow Us
Follow Us:
  • कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांची गय नाही
  • २ महिन्यांत थेट हकालपट्टी!
  • छ. संभाजीनगर मनपा आयुक्तांचा कडक इशारा
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी व कामगारांच्या कामगिरीवर विभागप्रमुखांनी बारकाईने लक्ष ठेवावे. येत्या दोन महिन्यांत त्यांच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्यात येणार आहे. काम समाधानकारक नसल्यास संबंधितांना सेवेतून कमी करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला. विभागप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी ई-आफिसचा प्रभावी अंमलने जावया कचरा व्यवस्थापन, उपस्थिती प्रणाली, नागरिकाभिमुख अॅप्स, सफारी पार्क विकास अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

महापालिकेतील सर्व विभागांनी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करावा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाज डिजिटल पद्धतीने हाताळण्यावर भर द्यावा. कोणतीही संचिका अनावश्यकपणे प्रलंबित राहू नये यासाठी विभागप्रमुखांनी नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. प्रशासनातील पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी ई-ऑफिसचा वापर वाढविण्यावर त्यांनी विशेष भर दिला. शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक वेळापत्रक नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक घंटागाडीचे मॅपिंग करून ती कोणत्या भागात, कोणत्या वेळेत पोहोचेल याची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

कामाची होणार तपासणी

महापालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती हजेरी अॅपच्या माध्यमातूनव नोंदविली जावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. विभागप्रमुखांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामावर नियमित देखरेख ठेवावी. दोन महिन्यांनंतर त्यांच्या कामगिरीचा स्वतंत्र आढावा घेतला जाणार असून निक्रिय किवा अपुऱ्या कामगिरीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’; वाचा कोणाकोणाचे अर्ज बाद?

अधिकाऱ्यांना माहिती नाही

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेली महापालिकेची विविध अॅप्स प्रभावीपणे कार्यान्वित करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. या अॅप्समध्ये आवश्यक सुधारणा करून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही विचार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांना घरबसल्या विविध सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सफारी पार्कसाठी एसटीपीच्या पाण्याचा पर्याय

मिटमिटा येथील सफारी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली असून आगामी काळात आणखी वृक्षारोपण होणार आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पड़ेगाव येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी) शुद्ध पाणी पाइपलाइनद्वारे सफारी पार्क परिसरातील विहिरीपर्यंत पोहोचविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच नियोजित सरकारी जागेभोवती संरक्षण भिंत उभारण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

Chhatrapati Sambhajinagar: ‘कचरा’ करणाऱ्यांची आता गय नाही! चार प्रकारांत वर्गीकरण अनिवार्य; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Web Title: Municipal commissioner warns contractual employees performance review

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Government Employees
  • Smart City

संबंधित बातम्या

महापालिकेचा भोंगळ कारभार! संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवर कारवाई कागदावरच; पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेची भीती
1

महापालिकेचा भोंगळ कारभार! संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवर कारवाई कागदावरच; पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेची भीती

पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
2

पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल
3

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
4

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.