जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या ४ जुलै रोजी होत असून, या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीसा’ठी १५८ उमेदवारांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी सोमवारी झाली. आक्षेपांवर जिल्हा उपनिबंधक सम्रत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. छाननीत अर्ज अवैध ‘केलेल्या अर्जाचा निकाल मंगळवारी जाहीर केला. अर्ज बाद ठरलेल्या उमेदवारांची संख्या ४५ आहे. अब्दुल समीर यांचा अर्ज हा सोयगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखा ही त्यांच्या मालकीच्या जागेत भाडेतत्वार घेण्यात आली असल्यामुळे ते बँकेचे लाभार्थी म्हणून त्यांचा अर्ज बाद ठरला आहे.
सहकारी बँक आपल्याच ताब्यात राहावी, असे मनसुबे आखून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काही दिग्गज नेत्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज बाद होण्यास सभासदाचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण नसणे, अर्जात त्रुटी असणे आदी कारणे आहेत.
अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मतदारसंघात २ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये रुपचंद गाडेकर, प्रदीप शिंदे यांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघात सुवर्णा जाधव, विशाल नादरकर, पुनम मगर, सुहास शिरसाट, दिपक जाधव, अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. शिरसाट हे विधान परिषद निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार आहेत. विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात मनोज राठोड, मंदाबाई राठोड, स्वरुपचंद कुकलारे, मधुकर हांडे या चार उमदेवारांचे अर्ज बाद केले आहेत.
फुलंब्री तालुक्यातून रामेश्वर चोपडे, आमदार अनुराधा चव्हाण यांचा अर्ज अवैद्य ठरला असला तरीही महिला प्रतिनिधी मतदारसंघातील त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. सोयगाव तालुक्यातील जयप्रकाश चव्हाण, कन्नडमधून आमदार रंजना चव्हाण, प्रिती पवार, मनोद देशमुख, गंगापूरमधुन इंदुमती साहेबराव पाटील, रुपचंद गाडेकर, वैजापूर तालुक्यातील मंदाबाई सोनवणे, पटेल परवीन नबी यांचा अर्ज बाद ‘रला आहे. बिगर शेती संस्था मतदारसंघातून अण्णासाहेब माने, अश्विनी मडके, प्रणिकेत पाटील, खान नुसरत अ. रहेमान कृषी पणन संस्था मतदारसंघातून आ. अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर अब्दुल सत्तार, रितेश मुनोत, काकासाहेब फरकाडे यांचे बाद ठरले आहेत.






