Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अशी बायको नको रे बाबा…’, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाला मारल्या उलट्या फेऱ्या; यमराजाला घातले साकडे

छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला १०८ उलट्या फेऱ्या मारत अनोखे आंदोलन केले. "अशी बायको नको रे बाबा" म्हणत पुरुषांनी मांडली आपली व्यथा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 01:33 PM
‘अशी बायको नको रे बाबा…’, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाला मारल्या उलट्या फेऱ्या; यमराजाला घातले साकडे
Follow Us
Follow Us:
  • ‘अशी बायको नको रे बाबा…’
  • वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाला मारल्या उलट्या फेऱ्या
  • यमराजाला घातले साकडे!
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीनुसार वटसावित्री पौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे व कुटुंब सुखी राहावे, अशी प्रार्थना करतात. मात्र सध्या अनेक पुरुषांना विवाहानंतर त्यांच्या पत्नीपासून मानसिक छळ, खोटे गुन्हे, न्यायालयीन लढाया, आर्थिक शोषण, सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक विघटन यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पत्नीपीडितांनी वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून ‘असली बायको नको रे बाबा’ अशी मागणी केली.

सात वर्षांपासून राबविला जातोय उपक्रम, कावळ्याचे केले जाते पूजन

मागील सात वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमांतर्गत यंदाही वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शनिवार, २८ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत सर्व पत्नीपीडित पुरुष हे शहर परिसरातील ‘पत्नी पीडित पुरुष आश्रम’ येथे गोळा झाले. येथे पिंपळ पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत कावळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी पिंपळ वृक्षाचे पूजन करून उलट्या १०८ प्रदक्षिणा घालून त्यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या.

Vat Purnima 2026: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद

अनेक पुरुषांनी वैवाहिक जीवनात गंभीर मानसिक, आर्थिक आणि कायदेशीर त्रास सहन केला आहे. काहींना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आले, काहींना कुटुंबापासून दूर व्हावे लागले, तर काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही समाजासमोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ज्या प्रकारच्या वैवाहिक यातना आम्ही या जन्मात भोगल्या, त्या पुन्हा कधीही आमच्या आयुष्यात येऊ नये, अशी प्रतीकात्मक प्रार्थना पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षासमोर केली असल्याची माहिती पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष अॅड. भारत फुलारे यांनी यावेळी दिली.

पत्नीकडून असह्य वेदना

वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी यमराज बिझी राहतील, म्हणून एक दिवस अगोदरच आम्ही हा उपक्रम करतो. पिंपळ पौर्णिमा साजरी करून ‘यमराजाला साकडे घालतो कि ‘हे यमराजा, आमच्या बायका उद्या येतील तुला खोट नाट सांगून आम्हाला त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे ऐकू नको. त्यांनी आम्हाला या जन्मात अतिशय असह्य वेदना दिल्या असल्याचे पत्नी पीडितांचे म्हणणे आहे.

Vat Purnima 2026: सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचे…! वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यामध्ये वाढेल गोडवा

Web Title: On the eve of vat purnima men aggrieved by their wives performed reverse circumambulations around a peepal tree and fervently appealed to lord yama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.