Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२,७४० कोटींच्या नव्या पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती; ४० MLD पुरवठा बंद, पावसाळ्यातही ११ दिवसांनी पाणी!

छत्रपती संभाजीनगरच्या २,७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. नक्षत्रवाडी पंपहाऊस बिघाडामुळे ४० MLD पुरवठा बंद करण्यात आला असून शहरात १० ते ११ दिवसांनी पाणी मिळत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 01:52 PM
२,७४० कोटींच्या नव्या पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती

२,७४० कोटींच्या नव्या पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती

Follow Us
Follow Us:
  • २,७४० कोटींच्या नव्या पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती
  • ४० MLD पुरवठा बंद
  • पावसाळ्यातही ११ दिवसांनी पाणी!
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नवीन पाणीपुरवठा योजनेला पहिल्याच पावसात मोठा धक्का बसला आहे. नक्षत्रवाडी येथील नव्याने उभारलेल्या पंपहाऊसच्या स्लॅबमधून गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नवीन योजनेतून शहराला मिळणारा वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, अवघ्या आठ दिवसांवर आलेला पाणीपुरवठ्याचा गॅप पुन्हा वाढून १० ते ११ दिवसांवर पोहोचल्याने पावसाळ्यातही शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचा दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २ हजार ७४० कोटी रुपयांची योजना राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेच्या आर्थिक सहभागातून उभारण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) जीव्हीपीआर कंपनीकडून केली जात आहे.

जुन्याच वेळापत्रकानुसार पाणी

मात्र नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याने कामाच्या गुणवतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्लॅबमधून झिरपणारे पाणी थेट पंपहाऊसमधील विद्युत पॅनलकडे येत असल्याने ते सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. संभाव्य तांत्रिक धोका टाळण्यासाठी २४ जूनपासून नवीन योजनेद्वारे सुरू असलेला वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सध्या गळती दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता सूत्रानी व्यक्त केली आहे. नवीन योजनेतून वाढीव पाणी मिळू लागल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा गैप दहा दिवसांवरून आठ दिवसांपर्यंत खाली आला होता. मात्र पुरवठा ठप्प झाल्यानंतर पुन्हा जुन्याच वेळापत्रकानुसार नागरिकांना पाणी मिळणार आहे.

Sanjay Shirsat: ‘आम्हाला ऑपरेशन टायगर ३…’, उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य

पावसाळ्यातही पाणीपुरवठ्याचा गॅप वाढला

सामान्यतः पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होते. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली आहे. मरीमाता जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या किराडपुरा, बायजीपुरा, बारी कॉलनी, इंदिरानगर, पोलीस कॉलनी आदी भागांमध्ये आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता १० ते ११ दिवसांनी मिळत आहे. हनुमान टेकडी, जयविश्वभारती कॉलनी, चिकलठाणा, ज्योतीनगर, चौधरी कॉलनी, शहागंज यांसह इतर अनेक भागांतील पाणीपुरवठ्याचाही गॅप वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात स्लॅबमधून गळती सुरू झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शहराच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेतील अत्यंत महत्त्वाच्या संरचनेत अशा प्रकारची गळती निर्माण झाल्याने संबंधित कामाची गुणवत्ता आणि देखरेखीबाबत प्रशासनाने सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

Web Title: Leakage in new 2740 crore water scheme during the very first rains 40 mld supply halted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • water scheme
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे
1

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे

‘अशी बायको नको रे बाबा…’, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाला मारल्या उलट्या फेऱ्या; यमराजाला घातले साकडे
2

‘अशी बायको नको रे बाबा…’, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाला मारल्या उलट्या फेऱ्या; यमराजाला घातले साकडे

Sanjay Shirsat: ‘आम्हाला ऑपरेशन टायगर ३…’, उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य
3

Sanjay Shirsat: ‘आम्हाला ऑपरेशन टायगर ३…’, उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
4

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.