
पेट्रोलचा तुटवडा संपला, पण रिक्षाचालकांचे हाल कायम (Photo Credit- X)
दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी पेट्रोल पंप एजन्सी आणि कंपन्यांची संयुक्त बैठक घेतली होती. यात एजन्सी आणि कंपन्यांतील अंतर्गत वादामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे समोर आले होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांना कडक सूचना केल्या होत्या. ‘तुमच्या अंतर्गत वादात शहराला वेठीस धरू नका, वाद एका दिवसात मिटवा, पंपांवर रांगा दिसता कामा नये, कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ येऊ देऊ नका’, अशा शब्दात त्यांनी एजन्सी आणि कंपन्यांना दम भरला होता.
शनिवारी रात्रीपासूनच या इशाऱ्याचा परिणाम दिसून आला. पंपांवर स्टॉक आला. तर रविवारी शहरातील सर्वच पंपांवरील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, काही दोन ते तीन पंप बंद असल्याचेही समोर आले. आज सोमवारी हे पंपदेखील सुरु होतील असे पेट्रोल पंप चालक असोसिएशनचे म्हणणे आहे.
पंप शहरात एलपीजीचे एकूण १३ ते १४ पंप आहेत. यात गौ-गॅसचे चार पंप आहेत. आज सर्वच बंद आहेत. एलपीजी गॅसचा तिढा दराबाबत आहे. या दरावर आपले नियंत्रण नसते. गॅसचे दर वाढले आहेत. एजन्सीला कमी दरात गॅस उपलब्ध झाला तर ते खरेदी करतात. आजचा दर १२० रुपये किलो आहे. आम्ही इतक्या महाग गॅस खरेदी करू शकत नाही असे रिक्षा असोसिएशनचे म्हणणे आहे. मी गो गॅस व्यवस्थापकाशी बोललो असून, ज्या रेटने व्हेसल येईल तो रेट लावला जातो असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शहरात गॅसचे वेगवेगळे दर असल्याची तक्रार अंबादास दानवे यांची होती. याची आम्ही तपासणी करणार आहोत. दरात तफावत असेल तर गुन्हे दाखल करू. शहरात २७ मार्च रोजी शेवटचा स्टॉक होता, त्यानंतर स्टॉक नाही. दरम्यान, आमचा नवीन हसलचा रेट येईल त्यानुसार गैस पाठवून असे नागपूर गो-गगैस एजन्सीकडून सांगण्यात आले आहे.
– प्रवीण फुलारी (जिल्हा पुरवठा अधिकारी)
दरम्यान, पेट्रोल-डिझेलचा विषय संपुष्टात आला असला तरी एलपीजी गॅसचा तुटवडा कायम आहे. शहरातील जवळपास सर्वच एलपीजी गॅस एजन्सी बंद आहेत. एलपीजीवर चालणाच्या रिक्षा व इतर वाहनांना दिवसभर गॅससाठी शोधाशोध करावी लागली मात्र गॅस मिळाला नाही. मिळणाऱ्या गॅसचे दर वाढल्याने एजन्सीकडून गॅस मागवला जात नसल्याचेही सूत्रांकडून कळले आहे. एरव्ही ६० ते ८० रुपये किलो दराने मिळणारा एलपीजी मागील आठवड्यात १०० रुपयांच्या वर गेला होता. सोमवारी हा दर ९९. ९५ रुपये प्रति किलो होता. हा दर परवडणारा नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. तर महागडा गॅस विक्री होत नसल्याने गॅस आणला जात नसल्याचे एजन्सीजचे म्हणणे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, दराच्या वादात हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांची मात्र फरपट होत आहे. हा तिढा सोडविण्याची मागणी रिक्षा चालक मालक असोसिएशनने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने 6. शहरातील पेट्रोलया तिढा सुटला आहे. सर्व पंपांवर स्टॉक आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रविवारीदेखील पानेवाडीचा डेपो सुरु ठेवला आहे. मात्र ट्रान्सपोर्टचा इशू असल्याने अद्याप किरकोळ पंप बंद आहेत. तो तिढाही आज (सोमवार) पर्यंत सुटेल. शहरातील सर्व पंप सुरळीत सुरु होतील.
अखिल अब्बास (अध्यक्ष, पेट्रोल पंप चालक असोसिएशन)
आज सोमवारी एलपीजीचा पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे, लवकरच आम्ही पालकमंत्र्यांकडे जाणार आहोत. ८८ जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी सूचना केल्यानंतर पेट्रोलचा तिढा सुटला. मात्र शहरातील दोनच एलपीजी पंप सुरू होते. यामुळे रिक्षाचालकांची ससेहोलपट होत आहे. रविवारी गॅसचा पुरवठा बंद असतो. त्यामुळे
– निसार अहमद (अध्यक्ष, रिक्षा चालक मालक असोसिएशन)