Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा! १२ जूनपासून नव्या १५०० मिमी जलवाहिनीतून पाणीपुरवठा; ‘या’ तारखेला होणार चाचणी

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी १२ जूनपासून १५०० मिमीच्या नव्या जलवाहिनीतून ४० ते ४० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात याची हायड्रोलिक चाचणी होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 31, 2026 | 03:14 PM
छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा! १२ जूनपासून नव्या १५०० मिमी जलवाहिनीतून पाणीपुरवठा; ‘या’ तारखेला होणार चाचणी
Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा!
  • १२ जूनपासून नव्या १५०० मिमी जलवाहिनीतून पाणीपुरवठा
  • ‘या’ तारखेला होणार चाचणी
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शहरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) आणि महापालिका प्रशासनाने नव्या पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीची अंतिम तयारी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून १२ जूनपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात शहराला अतिरिक्त ४० ते ५० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील अंतर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली असून अनेक भागांत सहा दिवसांआड, तर काही ठिकाणी आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मजीप्राने विविध तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून १५०० मिमी जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम वेगाने सुरू असून जूनच्या पहिल्या आठवड्यात तिची हायड्रोलिक चाचणी घेतली जाणार आहे. याआधी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. त्यामुळे शहराला अतिरिक्त १५ एमएलडी पाणी उपलब्ध झाले असून सध्या एकूण १६८ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे.

पहिल्या टप्प्यात ४० ते ५० एमएलडी पाण्याची भर

नव्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दररोज ४० ते ५० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार असून ते महापालिकेच्या मुख्य जलसाठा केंद्रांमार्फत वितरण व्यवस्थेत सोडले जाईल. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे. नव्या योजनेतून आणलेले पाणी शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून नक्षत्रवाडी येथील महापालिका क मजीप्राच्या एमबीआरपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. मात्र, अंतिम वितरणापूर्वी प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतरच हे पाणी नियमित वितरण व्यवस्थेत समाविष्ट केले जाईल.

Sillod Water Scarcity Tanker: सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके, केळगाव प्रकल्पाने गाठला तळ

हायड्रोलिक चाचणीनंतरच हिरवा कंदील

१५०० मिमी जलवाहिनी सुरू करण्यापूर्वी तिची हायड्रोलिक चाचणी घेण्यावर महापालिका आग्रही आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. चाचणीत जलवाहिनीची क्षमता, दाब सहनशक्ती आणि वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता तपासली जाणार आहे.

४० वर्षांची ७०० मिमी जलवाहिनी कायमची बंद

जायकवाडी धरणातून शहराला चार दशकांहून अधिक काळ पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. दीर्घकाळ वापरामुळे ती जीर्ण झाली होती. वाढत्या दाबाचा भार सहन करण्याची क्षमता कमी झाल्याने वारंवार बिघाड होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पर्यायी व्यवस्था सक्षम झाल्यानंतर ही जलवाहिनी बंद करून ९०० मिमी जलवाहिनीवर संपूर्ण भार टाकण्यात आला आहे.

८८ ५० मिमी ९०० मिमी जलवाहिनी कार्यान्वित एमएलडी पाणी मिळत असून सध्या १६८ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करण्यात यश आले आहे. १५०० मिमी जलवाहिनी १२ जूनपासून सुरू करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. समितीच्या निर्णयानंतरच अंतिम वितरणास सुरुवात केली जाईल. – अमोल येडगे, आयुक्त, महानगरपालिका

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीला ‘ऑलेक्ट्रा’चा झटका! ३२ कोटींचा बस डेपो सज्ज, पण चार्जिंग स्टेशन अद्याप रखडले

Web Title: Relief for the residents of chhatrapati sambhajinagar water supply from the new 1500 mm pipeline to begin on june 12

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
3

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.