Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Satara Water Crisis News: योजना सुरू करण्यात राजकीय दबाव आहे काॽ असेल तर तो झारीतील शुक्राचार्य कोणॽ जल जीवन योजना सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाली. तरीही ग्रामस्थांना पाणी नाही. हा प्रश्न राजकीय श्रेयवादाचा किंवा चिखलखीचा राहिलेला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 17, 2026 | 01:58 PM
Masur, Karad, Satara News, Jal Jeevan Mission, Water Crisis,

Masur, Karad, Satara News, Jal Jeevan Mission, Water Crisis,

Follow Us
Follow Us:
  • १४ कोटी रुपये खर्च करून जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना पूर्ण
  • नागरिकांच्या पाण्याच्या समस्येत अपेक्षित सुधारणा नाहीच
  • योजना सुरू करण्यात राजकीय दबाव आहे का
Satara Water Crisis News: कराड येथील सुमारे १४ कोटीची जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असली तरीही पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाचे पाणी प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. संबंधित प्रशासनाने 15 दिवसात प्रश्न सोडवला नाही तर महिलांचा हंडा मोर्चा काढू, असा इशारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. सह्याद्री कारखान्याचे संचालक दिनकरराव शिरतोडे, महेश घाडगे, शिकंदर शेख,जमीर मुल्ला, उपस्थित होते.

माजी सभापती जगदाळे म्हणाले गावातील पाणीटंचाई दूर व्हावी, प्रत्येक घरापर्यंत पुरेसे पाणी पोहोचावे, या उद्देशाने ही योजना हाती घेण्यात आली होती. मात्र, योजनेची अंमलबजावणी होऊनही नागरिकांच्या पाण्याच्या समस्येत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कधी मिळणार ॽ असा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपयांची योजना पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे हे दुर्दैवी आहे.

Sugar Price Festive Season : सरकारचा मोठा निर्णय! सणासुदीच्या काळात साखरेच्या दराचं काय?

मसूरची 14 कोटींची जलजीवन योजना

अनिश्चितीच्या गर्तेत सापडलेली, विविध वादांनी चर्चेत राहिलेली मसूरची 14 कोटींची जलजीवन योजना पूर्ण झाली.. वीजजोडणीचा अडसर दूर झाला… पाणी पूजन झाले… मात्र ग्रामस्थांच्या घरात पाणी पोचण्याच्या अंतिम टप्प्यात पुन्हा मिठाचा खडा पडला. तोही नळ कनेक्शनचा. नळजोडणी अभावी पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. नळजोडणी कुणाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे, मनमानी अरेरावीमुळे रखडली आहे. पाणी योजना झाली गावाला…. पण केवळ नावालाच. अशी चेष्टा मसूरकरांच्या नशिबी आली असे जगदाळे यांनी सांगितले.

योजना सुरू करण्यात राजकीय दबाव आहे का

योजना सुरू करण्यात राजकीय दबाव आहे काॽ असेल तर तो झारीतील शुक्राचार्य कोणॽ जल जीवन योजना सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाली. तरीही ग्रामस्थांना पाणी नाही. हा प्रश्न राजकीय श्रेयवादाचा किंवा चिखलखीचा राहिलेला नाही. तो ग्रामस्थांच्या पाण्याच्या गरजेचा, आरोग्याशी अस्तित्वाशी जोडणारा आहे. श्रेय कोणी घ्या.. पण पाणी द्या या ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र विशेष ग्रामसभा घेण्यासाठीची मागणी धुडकवली जात आहे.

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

 

कित्येक वर्षापासून कालबाह्य झालेल्या जुन्या पाणी योजनेवर तुटपुंजा पाण्यावर मसूरकरांना दिवस काढावे लागत आहेत. 24 तास स्वच्छ पाण्याची स्वप्ने दाखवण्यात आली. योजना पूर्ण झाली ..पण घरात पाणी नाही. 14 कोटीची योजना केवळ कागदावर पांढऱ्यावर काळे करण्यासाठी होती… की जनतेच्या तृप्तीसाठी. याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल..असेही मानसिंगराव जगदाळे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Satara karad masur water supply controversy jal jeevan mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Jal Jeevan Mission
  • Karad
  • Satara News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
1

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार
2

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय
3

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?
4

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.