
Road Accidents (Photo Credit- X)
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३६ अपघातप्रवण क्षेत्रांची नोंद असून, या ठिकाणी २८४ अपघातांमध्ये १५४ जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात २८ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे असून, तेथे २७३ अपघातांत तब्बल २५८ जणांना जीव गमवावा लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातही २८ अपघातप्रवण ठिकाणी २५१ अपघातांत १६७ जणांचा १९२ मृत्यू झाल्याची नोंद आहे. नांदेड जिल्ह्यात २३ ठिकाणी अपघात होऊन १८१ जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रे नोंदविण्यात आली आहेत.
१५ तर ६ नांदेड जिल्ह्यातील भोकर पाटा, देगलूर औद्योगिक वसाहतीजवळील रस्ता, पिंपळगाव परिसर, तसेच घाटमार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते, वेगमर्यादेचे उल्लंघन, अपुरी प्रकाशव्यवस्था व वाहतुकीचा ताण ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात मंजरसुभा, नंदगोपाळ दुग्ध केंद्र परिसर, अंबाजोगाईजवळील चौक तसेच ग्रामीण भागातील फाट्यांवर वारंवार अपघात होत आहेत.
विशेषतः ग्रामीण भागातील महामागाँवर बैग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने दुचाकीस्वार व पादचारी यांचा जीव धोक्यात येत आहे. दरम्यान, अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने रस्त्यांची रुंदी वाढविणे वळणांवर गतीरोधक, योग्य दिशादर्शक फलक, प्रकाश व्यवस्था, तसेच नियमित तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात कुरुंदा-कोठारी मार्ग, ज्वाळा बाजार परिसर, तसेच काही चौफुल्यांवर दुचाकी व अवजड वाहनांच्या धडका वाढल्या आहेत. अपघातप्रवण क्षेत्र घोषित होण्यामागे ठरावीक निकष असतात. एखाद्या पाचशे मीटरच्या रस्ता भागात सलग तीन वर्षांत गंभीर अपघात होऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यास त्या ठिकाणास अपघातप्रवण क्षेत्र घोषित केले जाते. मात्र, असे घोषित झाल्यानंतरही अनेक ठिकाणी सुधारणा कामे वेळेत होत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच राहते, ही गंभीर बाब ठरत आहे. वाहतूक नियोजनाचा अभाव, खराब रस्ते, अपुरी सूचना फलक व्यवस्था अतिक्रमणे, रात्री अपुरी प्रकाशव्यवस्था आणि वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन ही अपघातांची मुख्य कारणे मानली जात आहेत.