Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Highway Accidents: वेगवान समृद्धी महामार्ग ठरतोय ‘मृत्युमार्ग’! चार वर्षांत १ हजार ३९९ अपघात; तर ११२ जणांचा…

समृद्धी महामार्गावर गेल्या ३ वर्षांत १,३९९ अपघात झाले असून ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवेगामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आता आयटीएमएस (ITMS) प्रणाली लागू केली जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 03:19 PM
वेगवान समृद्धी महामार्ग ठरतोय 'मृत्युमार्ग'! (Photo Credit- AI)

वेगवान समृद्धी महामार्ग ठरतोय 'मृत्युमार्ग'! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • वेगवान समृद्धी महामार्ग ठरतोय ‘मृत्युमार्ग’!
  • चार वर्षांत १ हजार ३९९ अपघात
  • तर ११२ जणांचा…
अंकुश थोरात। नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर: वेगाची समृद्धी म्हणून ओळख मिळालेल्या या महामार्गावर अपघातांची मात्र अक्षरशः भरभराट होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत आणि २०२६ च्या फेब्रुवारीपर्यंत येथे तब्बल १३९९ अपघातांची नोंद झाली असून त्यातील ७४ प्राणांतिक दुर्घटनांत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. ओव्हरस्पीडिंग, अभियांत्रिकी त्रुटी आणि ब्लॅक स्पॉट्सवरील संथ उपाययोजना यामुळे समृद्धीवरील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून प्रशासनाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

७५ टक्के अपघातांचे मूळ कारण ओव्हरस्पीडिंग

महामार्गावरील अपघातांचे प्रमुख कारण वाहनांचा अनियंत्रित वेग असल्याचे समोर आले आहे. सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या सर्वेक्षणानुसार सुमारे ७५ टक्के अपघातांचे मूळ कारण ओव्हरस्पीडिंग आहे. सरळ आणि रुंद रस्त्यामुळे वाहनांचा वेग सहज वाढतो; मात्र त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने अपघात वाढत आहेत, विशेषतः सावंगी इंटरचेंज ते हडस पिंपळगाव हा पट्टा अपघातांच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

समृद्धी महामार्गावर आता ‘आयटीएमएस’ची नजर

महामार्गावरील अपघातांवर नियंत्रणासाठी आयटीएमएस (इंटेलिजेंट ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टीम) कार्यान्वित करण्यात येणार आहे. २७ ते २९ डिसेंबरदरम्यान या प्रणालीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या अंतर्गत सीसीटीव्ही आणि एएनपीआर कॅमेरे बसवून वाहनांचे क्रमांक ओळखले जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चालान पाठवले जाणार आहे, या प्रणालीत १७ प्रकारच्या वाहतूक गुन्ह्यांची नोंद होणार आहे. नियंत्रण केंद्र ठाणे जिल्ह्यातील आमने येथे असणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: रिक्षाचालक संकटात! गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला; भाडेवाढीसाठी RTO कडे धाव

समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडेवारी

२०२३३९० अपघात. १४ प्राणातिक अपघातांत ३२ मृत्यू. ५६ गंभीर अपघातांत १३१ जखमी, १५९ किरकोळ अपघातांत २७२ जखमी. १६१ अपघातांत जीवितहानी नाही.

२०२४ ४१६ अपघात. ३५ प्राणांतिक अपघातांत ४९ मृत्यू. ३३ गंभीर अपघातांत ११४ जखमी, १२८ किरकोळ अपघातांत २३८ जखमी. २२० अपघातात कुणीही जखमी नाही.

२०२५ ४९६ अपघात. २२ प्राणांतिक अपघातांत २८ मृत्यू. ४७ गंभीर अपघातांत १०० जखमी, १४८ किरकोळ अपघातांत २८७ जखमी. २७९ अपघातांत जीवितहानी नाही.

२०२६ (फेब्रुवारीपर्यंत) ६६ अपघात. ३ मृत्यु, ५ गंभीर अपघातांत ८ जखमी, २४ किरकोळ अपघातांत ५२ जखमी. ३४ अपघातांत कुणीही जखमी नाही.

८८ समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित होत आहे. प्रत्येक दोन किलोमीटरवर कॅमेरे बसवले जाणार असून वाहनांच्या वेगासह विविध बाबींची तपासणी केली जाईल, त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”
– किशोर चौधरी, पोलिस निरीक्षक, महामार्ग,

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट! उद्योजकांची तातडीची बैठक; राज्य सरकारकडे करणार मागणी

Web Title: Samruddhi mahamarg accidents data 112 deaths itms system activation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.