Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

नागपुरातील औषध दुकानांमध्ये नेमकं काय सुरू होतं? FDA आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या संयुक्त कारवाईत २२ लाख ३ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 09, 2026 | 04:15 PM
तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्...

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्...

Follow Us
Follow Us:
  • २२ लाख ३ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त.
  • FDA आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची संयुक्त कारवाई.
  • वाठोड्यातील फार्मसीचा औषध परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव.
 

नागपूर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या सत्रामुळे नियमबाह्य कामकाज करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत नशा आणणाऱ्या औषधांचा २२ लाख ३ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. याशिवाय, वाठोडा परिसरातील एका फार्मसीमध्ये आवश्यक कागदपत्रांशिवाय औषध विक्री सुरू असल्याचे आढळल्याने संबंधित दुकानाचा औषध परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्…

भारत माता चौक परिसरात छापा

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील भारत माता चौक परिसरात असलेल्या एका औषध दुकानात विनापरवाना औषध विक्री सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे FDA आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाईदरम्यान २२ लाख ३ हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला. नशा आणणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई केली जात असून, या प्रकरणात पुढील तपास केला जात आहे.

वाठोड्यातील फार्मसीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

दरम्यान, नागपुरातील वाठोडा परिसरातील एका फार्मसीमध्येही औषध नियमावलीनुसार आवश्यक कागदपत्रे नसताना औषध विक्री सुरू असल्याचे समोर आले. या प्रकरणाची दखल घेत FDA कडून संबंधित दुकानाचा औषध परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड

नियमबाह्य विक्रीवर FDA चा बडगा

गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाचा दबाव वाढला आहे. नागपुरातील ताज्या कारवाईतून औषध विक्रीतील नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Nagpur fda seizes illegal drug stock worth rs 22 lakh sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Drugs Case
  • Drugs News
  • FDA
  • FDA Action
  • FDA Raid
  • Medicines Issue
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
1

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?
2

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
3

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस
4

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.