Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: आला मार्च एंडिंग, आता ठेवू नका बिल पेंडिंग! ८१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्यापही २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 03:19 PM
आला मार्च एंडिंग, आता ठेवू नका बिल पेंडिंग! ८१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित (Photo Credit- X)

आला मार्च एंडिंग, आता ठेवू नका बिल पेंडिंग! ८१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • आला मार्च एंडिंग
  • आता ठेवू नका बिल पेंडिंग!
  • ८१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
छत्रपती संभाजीनगर: वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील तब्बल ८१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणने गेल्या महिनाभरात खंडित केला. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्यापही २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे स्वतः परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत. थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar आर्थिक प्रगतीपथावर! जिल्हा उत्पन्नात 54 टक्क्यांची भरघोस वाढ; ‘महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26’ जाह

छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ९८ हजार ८९९ वीज ग्राहकांकडे ४७ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात गेल्या महिनाभरात १८ हजार ७९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १ लाख ४८ हजार ४६४ वीज ग्राहकांकडे ४६ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

ग्रामीण मंडलात ३७ हजार ४५५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच जालना मंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १ लाख १२ हजार ३८७ वीज ग्राहकांकडे १२८ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. जालना मंडलात २६ हजार २६७ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या महिनाभरात खंडित करण्यात आला. थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व बीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

थकबाकीदाराचे होतेय आता ‘क्रॉस चेकिंग’

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात

Web Title: Sambhaji nagar 81 thousand exhausted electricity supply disrupted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Light Bill
  • mahavitaran

संबंधित बातम्या

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त
1

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक
2

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
3

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.