Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

४३ अंश तापमानात शाळा तपासणीचे फर्मान! छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक आक्रमक; राष्ट्रीय कार्य की छळवणूक? संघटनांचा सवाल

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४३ अंश तापमानात शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शाळा तपासणी मोहिमेमुळे शिक्षक आक्रमक झाले आहेत. जनगणना ड्युटी सुरू असताना सुट्ट्यांमध्ये छळवणूक थांबवण्याची मागणी केली जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 18, 2026 | 03:10 PM
४३ अंश तापमानात शाळा तपासणीचे फर्मान! छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक आक्रमक

४३ अंश तापमानात शाळा तपासणीचे फर्मान! छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक आक्रमक

Follow Us
Follow Us:

 

  • जनगणनेबरोबरच शाळा तपासणीचेही काम
  • जिल्ह्यातील शिक्षक संघटना एकवटल्या
  • शासन, प्रशासनाकडे आज दाद मागणार
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): राष्ट्रीय कार्य जनगणनेची शिक्षकांना ड्युटी देण्यात आली आहे. ही मोहीम उन्हाळ्याच्या सुट्यात होणार असल्याने शिक्षकवर्गात नाराजी आहे. दोन्ही कामे करताना प्रचंड ओढाताण होणार आहे. त्यातच भर उन्हात ही कामे करावी लागणार असल्याने शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर राहणार आहे. यासाठी १५ जूननंतर ही मोहीम राबवावी अशी मागणी शिक्षकवर्गातून होते आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. १८ मे ते ३० मे दरम्यान रखरखत्या उन्हात प्रशासनाकडून होणारी शाळा तपासणीचा नेमका उद्देश काय आहेत? सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहेत. जवळपास सर्वच शिक्षकांना जनगणनेची ड्युटी लागलेली आहेत. जनगणनेची ड्युटी करावी की शाळा तपासणी अहवाल पूर्ण करावा या प्रश्नाने शिक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहेत. प्रशासन भर उन्हात कसे जागे होते ? जिल्हास्तरावरून सुरू होणारी ही प्रक्रिया मे महिन्यात सुरु न करता शाळा सुरू झाल्यानंतर करावी. भर उन्हाळ्यात होणाऱ्या तपासणीमुळे सर्व अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक या अतिशय महत्त्वाच्या घटकावर या प्रक्रियेचा प्रचंड ताण पडणार आहेत. मुख्याध्यापक शाळेत जातील तर ते शाळेतील सर्व शिक्षकांना बोलावणारच.

शाळा तपासणी नंतरच करा

तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा तब्येतीचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढ्या प्रचंड येलो अलर्ट रेड अलर्ट असलेल्या ४३ अंश तापमान असताना त्यांना फिरायला लावणे चुकीचे असल्याचे शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेने रविवार, १७ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांची भेट घेत निवेदन दिले. शाळा तपासणी मोहिमेला आमचा विरोध नाही परंतु सध्या सर्व शिक्षक हे जनगणना, बीएलओ यासारख्या राष्ट्रीय कामात गुंतलेले असल्याने आता सुट्टीच्या काळात शाळा तपासणी करणे योग्य होणार नाही. ही तपासणी शाळा सुरू झाल्यानंतर १५ जूननंतर करण्यात यावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.

Sanjay Shirsat: “इंधन दरवाढीचा निवडणुकांशी काडीचाही संबंध नाही!” मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले

प्रशासनाची भेट घेऊन शिक्षकांची बाजू मांडणार

दर्म्य, याबाबत सीईओ यांच्याशी सोमवारी चर्चा करणार असून सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन अध्यक्षांनी दिले असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आज सोमवारी (१८) याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, झेडपी शिक्षण सभापती, सीईओ, शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन शिक्षकाची बाजू मांडणार असल्याचे शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, जनगणना, एसआयआर मोहीम, केंद्र व राज्य सरकार यांनी इंधनाची बचत करणे, वर्क फॉम्होम करणे, अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय हितासाठी आवाहन केलेले
असतांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला बगल देऊन सरसकट शाळा तपासणीचे पत्र काढून राष्ट्रीय कार्यात बाधा निर्माण करण्यात येत आहे. अत्यंत खेदजनक बाब आहे. म्हणून आदर्श शिक्षक समितीच्या वतीने आज सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोग, प्रधान सचिव, जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबूलाल राठोड यांनी दिली आहे.

शिक्षण विभागात चाललंय तरी काय ?

जिप शिक्षण विभागाकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुख्याध्यापकांनी विविध प्रलंबित कामे पूर्ण करावीत असे सांगितले जात असतानाच १८ मेपासून शाळा तपासणी सुरू करण्यात येईल असेही सांगितले जात आहे. प्रशासनाला नेमकं करायचं तरी काय आहे? शिक्षकांना काम करायला द्यायचं आहे की फक्त आदेशावर आदेश काढायचे आहेत? असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उपस्थित केला आहे. एकीकडे शिक्षकांवर जनगणना व एसआयआर सारख्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण असताना दुसरीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीतील कामाचे आदेश आणि त्याच काळात भर उन्हात तपासणीचे फर्मान असल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. तापमान ४३ अंशांच्या पुढे, शाळा बंद, विद्यार्थी घरी, आणि प्रशासन मात्र तपासणीच्या नावाखाली कागदपत्रांची मोहीम राबवण्यात व्यस्त आहे. ही संपूर्ण प्रक्रिया १५ जूननंतर राबवा असे परिषदेने म्हटले आहे. हे वेळापत्रक रद्द करण्यासाठी आज सीईओ व शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षक संघ शिक्षकांची बाजू मांडणार असल्याचे राजेश हिवाळे यांनी म्हटले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: वा रे वा! शहरात पाण्यासाठी वणवण, अन मनपा पदाधिकाऱ्यांसाठी २५ लाखांच्या आलिशान ‘ईव्ही’ गाड्यांची खरेदी

Web Title: Sambhajinagar teachers protest against school inspection during summer vacation and census duty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Census
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!
1

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
2

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.