Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही! पालकमंत्र्यांचा ‘स्पेशल फोर्स’चा मास्टरप्लॅन; बागेश्वर बाबांनाही दिला इशारा

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी 'स्पेशल फोर्स' तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बागेश्वर बाबांना इशारा देत राजकीय भेटींच्या अफवा फेटाळल्या आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 02:34 PM
संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही! पालकमंत्र्यांचा 'स्पेशल फोर्स'चा मास्टरप्लॅन (Photo Credit- X)

संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही! पालकमंत्र्यांचा 'स्पेशल फोर्स'चा मास्टरप्लॅन (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही!
  • पालकमंत्र्यांचा ‘स्पेशल फोर्स’चा मास्टरप्लॅन
  • बागेश्वर बाबांनाही दिला इशारा
छत्रपती संभाजीनगर, शहर प्रतिनिधी: संभाजीनगर शहरात वाढत असलेल्या गुंडगिरीवर आळा घालण्यासाठी लवकरच अॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी विविध मुद्यांवर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. शहरात सुरु असलेल्या गुन्हेगारी कारवायांबद्दल ते म्हणाले, शहरात गेल्या महिन्याभरात चार-पाच खून झाले आहेत. मी कालच पोलीस आयुक्तांना याबाबत विचारणा केली आहे.

पालकमंत्र्यांचा ‘स्पेशल फोर्स’चा मास्टरप्लॅन

ड्रग्सचे वाढते प्रमाण लक्षात आले आहे. शहरात संघटित गुन्हेगारी आता प्रत्येक विभागात तयार होत चालली आहे. पुंडलिक नगर पोलीस ठाणे हद्दीत दररोज नवनवीन गुन्ह्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना मी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही वाढत असलेली संघटित गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिसांकडील एक स्पेशल फोर्स तयार करून गुंडांना शोधणे, त्यांना जेलमध्ये टाकणे, त्यांच्यावर मोक्कासारख्या कारवाया करणे, इतकेच काम या टीमने करायचे आहे. तेव्हाच ही गुंडगिरी थांबेल. किरकोळ गुन्हेगारसुद्धा आज रस्त्यावर चाकू घेऊन फिरताना दिसतोय. लवकरच याचा ऍक्शन प्लॅन तयार होईल अशी माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा हाहाकार! पारा ४३.४ अंशांवर, मागील ३ वर्षांतील एप्रिलचा सर्व विक्रम मोडीत

बाबांनी बाबागिरी सोडून आता राजकारणात यावे

बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या बक्तव्याचा समाचार घेताना मंत्री शिरसाट म्हणाले, बागेश्वर बाबांना काय इतिहास माहिती आहे? शिवाजी महाराज त्यांनी कधी वाचले आहेत का? काहीही वक्तव्य करून स्वतःची विद्वत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबांनी आता बाबागिरी सोडावी आणि राजकारणात यावं, हे त्यांच्यासाठी योग्य राहील. जनसमुदाय ऐकतोय म्हणून कुठलेही वक्तव्य करून लोकांच्या डोक्यात काहीतरी राग घालण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा इशारा शिरसाट यांनी दिला.

त्या बातमीत विश्वासार्हता नाही..

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर त्यांची भेट घेतल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. यावरून पडद्यामागे राजकारणात काहीतरी शिजतंय असेही बोलले जात आहे. यावर मंत्री शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरेंनी रात्री वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र या बातमीत विश्वासार्हता नाही.

Chhatrapati Sambhajinagar: गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा! १.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर; आजपासून ग्रामीण भागात वितरण सुरू

Web Title: Sanjay shirsat action plan against crime in sambhajinagar warning to bageshwar baba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • MAL Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश
1

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष; पाच तालुक्यांत पाणीटंचाई, जिल्ह्याच्या सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ
2

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष; पाच तालुक्यांत पाणीटंचाई, जिल्ह्याच्या सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ

Ayushman Card: मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त ‘आयुष्मान भारत’ कार्डांची निर्मिती, ५ लाखांचे विमा संरक्षण!
3

Ayushman Card: मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त ‘आयुष्मान भारत’ कार्डांची निर्मिती, ५ लाखांचे विमा संरक्षण!

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे
4

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.