Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या

छत्रपती संभाजीनगरात निवृत्त प्राध्यापकाला ईडी आणि मुंबई पोलिसांची भीती दाखवून ३२.५० लाखांचा गंडा घालणाऱ्या गुजरातच्या दोन सायबर गुन्हेगारांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 22, 2026 | 03:02 PM
Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या
Follow Us
Follow Us:
  • सावधान!
  • ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
  • पोलिसांनी गुजरातून आवळल्या मुसक्या
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): ‘ईडी’ (ED) आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीची भीती दाखवून शहरातील एका ८४ वर्षीय निवृत्त प्राध्यापकाची ३२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा बेगमपुरा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. नऊ महिन्यांच्या अथक आणि तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी गुजरातमधील जुनागढ येथून दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या सायबर फसवणूक रॅकेटमधील तिसरा आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. राजेशकुमार कांजीभाई वडालिया (वय ५२) आणि कनुभाई पुनाभाई चोटानी (वय ४५, दोघे रा. जुनागढ, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दिपेनकुमार गिरीशभाई टिलवा हा तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या मोठ्या कारवाईची माहिती दिली.

‘मनी लॉन्ड्रिंग’ आणि अटकेची भीती दाखवून लुटले

जयसिंगपुरा भागातील रहिवासी असलेले सुदाम वामनराव राजभोज (वय ८४) हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. “मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात गुन्हा दाखल आहे,” असे सांगून भामट्यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अवैध संपत्ती, मनी लॉन्ड्रिंग आणि ईडी चौकशीचे भय दाखवत स्वतः केंद्रीय तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचे भासवले.

अटक टाळायची असेल तर तुमच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी लागेल, असे सांगून वृद्ध प्राध्यापकांकडून आधी एक हस्तलिखित अर्ज लिहून घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवून, त्यांच्या नावावर असलेली २८ लाख ५० हजार रुपयांची मुदत ठेव (FDR) मोडण्यास भाग पाडले. ही सर्व रक्कम आरटीजीएस (RTGS) द्वारे आरोपींच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली. इतर व्यवहारांसह भामट्यांनी एकूण ३२ लाख ५० हजार रुपये उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी चक्क सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) बनावट पत्रही प्राध्यापकांना दाखवले होते.

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच धक्कादायक प्रकार उघड

तांत्रिक तपासातून गुजरातमध्ये पडल्या बेड्या

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्राध्यापकांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँक खाती, मोबाईल क्रमांक, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि एसडीआर (SDR) चा सखोल तांत्रिक अभ्यास केला. आरोपींचे लोकेशन गुजरातमधील जुनागढ येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने गुजरात गाठून दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एकाच दिवसात खात्यात ८८ लाखांची उलाढाल; मोठे रॅकेट असण्याचा संशय

पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यात देशभरातील विविध सायबर गुन्ह्यांतील रक्कम जमा होत होती. एकाच दिवसात या खात्यात तब्बल ८८ लाख रुपये जमा झाल्याची नोंद पोलिसांना आढळली आहे. ही रक्कम तात्काळ इतर विविध खात्यांमध्ये वळवली जात होती. त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय किंवा देशव्यापी मोठे सायबर रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

खत व्यवसायाच्या आडून काळे धंदे?

प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपी हे खताच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या खत व्यवसायाच्या आडून हे भामटे सायबर गुन्हेगारी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचे जाळे चालवत होते का, याचा शोध आता बेगमपुरा पोलीस घेत आहेत.

Aurangabad News : वटपाैर्णिमेच्या पूजेत अद्विक हरवला, पोलिसांच्या शोधकार्यात सापडला 4 वर्षांपूर्वी हरवलेला शिवम

Web Title: Senior citizen defrauded under the pretext of ed inquiry police nab accused from gujarat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर
1

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
2

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भरदिवसा 3 ठिकाणी घरफोड्या; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु
3

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भरदिवसा 3 ठिकाणी घरफोड्या; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.