धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून...
शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहन अनिल पाटसकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील अल्पवयीन मुलीची ओळख रोहन पाटसकर याच्यासोबत झाल्यानंतर रोहन याने मुलीची ओळख वाढवून मुलीशी मैत्री करत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी भेटला. दरम्यान, त्याने मुलीवर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. नुकतेच मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी कोरेगाव भीमा येथील एका रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यानंतर सदर मुलगी गरोदर असल्याचे समोर आले.
दरम्यान, कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने घडला प्रकार कुटुंबियांना सांगितला. तर घडलेल्या प्रकाराबाबत पीडित अल्पवयीन मुलीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रोहन अनिल पाटसकर (वय २७, रा. फुलगाव ता. हवेली जि. पुणे) याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचारासह आदी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मस्कर हे करत आहे.
काकाकडून मुलीवर अत्याचार
दुसरीकडे, झारखंड येथून एक नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या सख्ख्या मावशीच्या नवऱ्याने म्हणजेच काकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपीला अटक केली आहे.
लग्नाच्या आमिषाने मुलीवर अत्याचार
कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.






