Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: ‘भक्ती’ आहे पण ‘पाणी’ नाही! कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण; देवस्थान प्रशासन उदासी

खडकेश्वर आणि गजानन महाराज मंदिरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने भाविकांचे हाल होत आहेत. वाढत्या उन्हात भाविकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असून मंदिर प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 23, 2026 | 02:46 PM
कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण

कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण

Follow Us
Follow Us:

 

  • ‘भक्ती’ आहे पण ‘पाणी’ नाही!
  • कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण
  • देवस्थान प्रशासन उदासी
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच, शहराच्या आध्यात्मिक केंद्रांवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील ऐतिहासिक खडकेश्वर मंदिर असो वा गजबजलेले गजानन महाराज मंदिर, अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये पिण्याच्या पाण्याची (पाणपोईची) सोय नसल्याने भाविकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे, लागत आल्याचे सध्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. दररोज हजारो भाविक स्थानिक आणि बाहेरील जिल्ह्यांतून दर्शनासाठी शहरात येत असतात. सध्या तापमानाचा पारा ४१ हून अधिक अंशांच्या पार गेला असून, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण आहेत. अशा स्थितीत मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी थंडगार माठातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे ही किमान गरज आहे. मात्र, वास्तवात चित्र वेगळेच दिसत आहे.

शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या प्राचीन खडकेश्वर महादेव मंदिर परिसरात पाण्याची कायमस्वरूपी आणि सुसज्ज पाणपोई दिसून येत नाही. दर्शनासाठी येणाऱ्या वृद्धांना आणि लहान मुलांना तहानेने व्याकुळ व्हावे लागत आहे. तेथे प्लास्टिक टाकी मात्र दिसून आली. थंडगार पाण्याचे माठ नसलेली स्थिती पुंडलिकनगर भागातील गजानन महाराज मंदिर आणि इतरही काही मोठ्या देवस्थानांची आहे. या मंदिरांमध्ये उत्सवांच्या काळात मोठी गर्दी असते, मात्र खास उन्हाळ्यासाठी लाल कपडा बांधून पारंपरिक माठातील थंडगार पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशासन आणि मंदिर विश्वस्त उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. काही वर्षांपूर्वी मंदिर परिसरात येथे असणाऱ्या पारंपरिक लाल कपडा बांधलेला माठ नामशेष झाल्याचे चित्र आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘स्कॅनर’ घोटाळ्यावरून खळबळ; मुख्य अभियंता अतुल चव्हाणांच्या बदलीसाठी सरपंच मंगेश साबळे आक्रमक

भाविकांची ‘विकतच्या’ पाण्यावर मदार

शहरातील बऱ्याच मंदिरांच्या आवारात पाणी उपलब्ध नसल्याने भाविकांना नाईलाजास्तव बाहेरून ग्लासभर पाण्यासाठी १ते २० रुपये मौजून महागड्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. विशेषतः गरीब, ग्रामीण भागातील भाविकांसाठी हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. भक्तीच्या ओढीने आम्ही मंदिरात येतो, पण किमान थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय नसावी, हे दुर्दैवी आहे, अशी खंत युक्त भावना सरूबाई बोडके या ज्येष्ठ महिला भाविकाने व्यक्त केली.

विश्वस्तांनी पुढाकार घेण्याची गरज

अनेक ठिकाणी मंदिरांकडे लाखो रुपयांचा निधी जमा होतो. मात्र, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक आणि भाविक करत आहेत. किमान उन्हाळ्यात माठातील थंडगार पाणी संस्थांनी किंवा मंदिर प्रशासनाने तातडीने मंदिरांच्या प्रवेशद्वारावर किंवा आवारात ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले ‘बर्लिन’! ज्योतीनगरमध्ये शहरातल्या पहिल्या अत्याधुनिक प्ले पार्कचे लोकार्पण

Web Title: Water crisis at temples in chhatrapati sambhajinagar pilgrims struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • temple
  • Water Crisis

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.