Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Supply Issue: सणासुदीला ‘पाणीटंचाई’! मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यवर्ती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; गृहिणींचे हाल

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य जलवाहिनी फुटल्याने जुना बाजार, घाटी परिसर आणि मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुढीपाडवा आणि ईदच्या काळात नागरिकांचे हाल होत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 20, 2026 | 02:58 PM
मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यवर्ती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत (Photo Credit-X)

मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यवर्ती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत (Photo Credit-X)

Follow Us
Follow Us:

 

  • सणासुदीला ‘पाणीटंचाई’!
  • मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यवर्ती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
  • गृहिणींचे हाल
Chhatrapati Sambhajinagar Water Supply Issue: छत्रपती संभाजीनगर शहरासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल सुरू करण्याचा ऐतिहासिक सोहळा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला. मात्र याच वेळी जुन्या शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मुख्य जलवाहिनी फुटल्याने सणासुदीत पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या जलपुरवठा व्यवस्थेतील अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गुरुवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातून ज्युबली पार्ककडे जाणारी ७०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. जलवाहिनीतील प्रचंड दाबामुळे काही वेळातच रस्त्यावर पाण्याचे मोठे लोट वाहू लागले.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ रेल्वे स्टेशन गेटसमोरील व्हॉल्व्ह बंद करून पाणीपुरवठा थांबवला. मात्र या तांत्रिक विधाडाचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागातील वितरण व्यवस्थेला बसला असून, संपूर्ण पुरवठा विस्कळीत झाला आहे.

दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, ते युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही या भागातील नियोजित पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. परिणामी, ईद आणि गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Vaijapur Solar Bill Issue: सौरऊर्जा की ‘शॉक’ ऊर्जा? वैजापूरमध्ये निवृत्त अधिकाऱ्याला 1 लाखाचे वीजबिल; नेमका गोंधळ काय?

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असले, तरी अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे विशेषतः गृहिणींचे हाल होत आहेत. सणासुदीच्या तयारीत पाण्याअभावी अनेक घरांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.

प्रभावित भाग

बुढीलाईन, जुना बाजार, आसफिया कॉलनी, जयभीमनगर, घाटी परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाचे आवाहन

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच नियमित पुरवठा सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Crime News: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; चाकूने वार करत 40 हजारांची खंडणी उकळली, अन्…

Web Title: Water supply disrupted in central city due to burst main water main housewives in distress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
1

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
2

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.