Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा १०० दिवसांचा कारभार; ग्रामीण विकासाला गती, शाळांच्या दुरुस्तीवर विशेष भर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी पदभाराच्या १०० दिवसांत विकासकामांना गती दिली आहे. ६६ कोटींच्या निधीसह ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सीएसआर फंडाचा वापर केला जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 13, 2026 | 01:59 PM
जिल्हा परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा १०० दिवसांचा कारभार

जिल्हा परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा १०० दिवसांचा कारभार

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा १०० दिवसांचा कारभार
  • ग्रामीण विकासाला गती
  • शाळांच्या दुरुस्तीवर विशेष भर
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जिल्हा परिषद नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर आता विकासकामांना गती आली आहे. पदाधिकऱ्यांनी आपल्या गटात गरजांची माहिती घेणे सुरु केले आहे. यासाठी पदाधिकारी गटांमध्ये फिरत आहे. ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत. ग्रामीण विकास करताना विशेष करून शाळांकडे अधिक लक्ष देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिली.

जिल्हा परिषदेत प्रशासक काळ संपून आता नूतन कार्यकारिणी रुजू झाली आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी विकासकामांना गती दिली जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आतापर्यंत दोन सर्वसाधारण सभा पार पडल्या. १८ मार्च २०२६ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २ एप्रिल रोजी पहिली सर्वसाधन सभा होऊन विषय समिती सभापतींची निवड झाली.

कार्यकारिणीची निवड होऊन जवळपास १०० दिवसांचा कालावधी झाला आहे. यातील ४० ते ४५ दिवस हे विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेत गेला. २० ते २५ दिवस हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीत गेला तर उर्वरित २० ते २५ दिवसांच्या कार्यकाळात सर्व पंचायत समित्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आता सर्व पदाधिकारी आपल्या गटांमध्ये विकासकामांची माहिती घेत आहेत.

बिडकीनपासून शाळा दुरुस्ती सुरु

जिल्ह्यात १९६२, ते १९७० सालातील शाळा खोल्या अद्याप अस्तित्व टिकवून आहे मात्र त्या जीर्ण झाल्याने त्यांची दुरुस्ती गरजेची आहे. शासनाकडून डीपीसीचा मिळणारा निधी तुटपुंजा आहे. म्हणून विविध उद्योगांकडून सीएसआर फंड मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बिडकीन येथे टोयोटा कंपनीकडून झेडपी शाळेचा कायापालट होतो आहे. ही आता सुरुवात आहे. यापुढे सीएसआरच्या माध्यमातून सर्वच शाळांना अत्याधुनिक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे गलांडे म्हणाले.

मंगेश साबळेंच्या अडचणीत वाढ, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

शिक्षणाच्या बळकटीसाठी आता जिल्हा परिषद सरसावले

जिल्ह्यात जलजीवन मिशनला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. इतर विभागांतील प्रलंबित कामांनाही गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात सीईओंसह विभाग प्रमुखांचेही सहकार्य मिळत आहे. लवकरच संभाजीनगर जिल्हा परिषद ही गतिमान प्रशासन चालवणारी जिल्हा परिषद म्हणून समोर येईल असा विश्वास अध्यक्ष गलांडे यांनी व्यक्त केला. या काळात शिक्षण क्षेत्रात अधिक प्रलंबित कामे होती. ती पूर्ण केली. यात मागील १० ते १५ वर्षांपासून रिक्त असलेली ६४ केंद्र प्रमुखांची पदे भरण्यात आली. १६ विस्तार अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. लवकरच १५० मुख्याध्यापकांना पदोन्नती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील विस्थापित ९४ शिक्षकांनाही नियुक्त्या दिल्या जातील. एकंदरीत ग्रामीण शिक्षण अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद सरसावले असल्याचे गलांडे म्हणाले.

लवकरच निधी हाती येईल

थोड्या दिवसातच जिल्हा नियोजन समितीचे नितव्यय जिल्हा परिषदेला प्राप्त होईल. त्याचे नियोजन करण्यात येईल. सोबतच १५व्या वित्त आयोगाची ६६ कोटींपेक्षा अधिकची रक्कम झेडपीच्या प्राप्त आहे. याचे तसेच सेस फंडाचे नियोजनदेखील केले जात आहे. विषय समित्या, स्टैंडिंग कमिटी, सर्वसाधारण सभा यांत समन्वय ठेवून जिल्हा परिषदेचे कामकाज सुरु आहे. झेडपीच्या नूतन इमारतीसाठी १४ कोटींच्या खर्चाला जीबीमधून मान्यताही मिळाली आहे. येथे सर्व विभाग एकत्रित येऊन जिल्हयाच्या विकासाठी काम करणार असल्याचे गलांडे म्हणाले.

Don Baba Farzan : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Web Title: Zilla parishad president avinash galande development works and school repair marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Zilla Parishad
  • ZP School

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
1

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.